धक्कादायक! लग्नाच्या पहिल्याच रात्री संसार उद्धवस्त; शारीरिक संबंधादरम्यान पत्नीचा मृत्यू

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं या तरुणीचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं (Woman died while having sex) आहे.

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं या तरुणीचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं (Woman died while having sex) आहे.

  • Share this:
    ब्राझील 15 जून : एक धक्कादायक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीच पतीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं या तरुणीचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं (Woman died while having sex) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळलेल्या नाहीत त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लग्नानंतर पहिल्याच रात्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना या महिलेला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर रुग्णालयात घेऊन जात असतानाच तिचा मृत्यू झाला. ही घटना ब्राझीलच्या इबिराइट शहरातील आहे. द सननं दिलेल्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं, की या 18 वर्षीय तरुणीचा 29 वर्षाच्या युवकासोबत विवाह झाला आणि रात्री अचानक तिला अस्वस्थता जाणवू लागली. यानंतर ती जमिनीवर कोसळली यानंतर महिलेच्या पतीनं शेजाऱ्यांना फोन केला आणि रुग्णालयात जाण्यासाठी टॅक्सी आणण्यास सांगितलं. VIDEO: टोळीचा दिवसाढवळ्या दुकानदारावर गोळीबार, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद रिपोर्टनुसार, आधी एका टॅक्सी ड्रायव्हरनं महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यास नकार दिला. यानंतर दुसरी टॅक्सी बोलवण्यात आली आणि त्या ड्रयव्हरनंही मदत करण्यास नकार दिला. त्यानं रुग्णवाहिका बोलावण्याचा सल्ला दिला. पतीनं असा आरोप केला आहे, की रुग्णवाहिका येण्यास तब्बल एक तास लागला आणि याच कारणामुळे त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. पुण्यात पुलाखाली आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह; घातपाताच्या संशयानं परिसरात खळबळ शवविच्छेदन रिपोर्टमध्ये असं समोर आलं, की या महिलेला ब्रोंकाइटिस आहे, या आजारात श्वासनलिकेत सूज येते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे पुरावे आढळलेले नाहीत. शेजाऱ्यानंही पोलिसांना सांगितलं, की महिलेच्या मृत्यूच्या आधी त्यानं कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा किंवा आवाज ऐकला नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published: