राष्ट्रीय महामार्गावर जमीन खचली, भिंत कोसळतानाचा धक्कादायक VIDEO व्हायरल

नुकसान पाहून रस्ता पुन्हा नीट करण्यासाठी महिनाभर कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महामार्गाचे बांधकाम अलीकडेच झालं होतं.

नुकसान पाहून रस्ता पुन्हा नीट करण्यासाठी महिनाभर कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महामार्गाचे बांधकाम अलीकडेच झालं होतं.

  • Share this:
    इटानगर, 31 मे : आपल्याकडं रस्त्याची कामे, रस्तेबांधणी याविषयी कोणी समाधानी असेल असं अजिबात चित्र नाही. गावा-गावातील रस्ते उन्हाळ्यात बांधले जातात आणि पावसाळ्यात त्यांचे तीन तेरा वाजते, अशी अनेक ठिकाणी स्थिती आहे. काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गदेखील याला अपवाद नाहीत. अशाच एका रस्त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. पावसामुळे जमीन खचली आणि रस्त्याला सहाय्यक म्हणून बांधलेली भिंत कोसळली. पाणी साठून राहिल्यामुळं त्याचा दाब पडून जमीन खचली आणि त्याचा दाब भिंतीवर पडल्याने राष्ट्रीय महामार्गाला सहाय्यक म्हणून बांधलेली भिंत धक्कादायकरित्या कोसळली. हा सर्व प्रकार अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 415 येथे घडला आहे. महामार्गाचा मोठा भाग मुसळधार पावसामुळं वाहून गेला. झालेले नुकसान पाहून रस्ता पुन्हा नीट करण्यासाठी महिनाभर कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महामार्गाचे बांधकाम अलीकडेच झालं होतं. तरीही या मोठ्या पावसात त्याचा टिकाव लागू शकला नाही. म्हणजेच त्याचं काम कितपत योग्य झालं होतं, याबाबत आता परिसरातील लोक शंका उपस्थित करत आहेत. पावसाळा अद्याप सुरू झालेला नाही, तोपर्यंतच अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याचे काय होईल असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. हे वाचा - ऐकावं ते नवलच..! लग्नात सप्तपदी घेता-घेताच नवरा-नवरी खेळायला लागले गेम, VIDEO व्हायरल मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वातील सरकारने अलिकडेच या रस्त्याचा काही भाग बांधून पूर्ण केला होता. आता पावसाळा येण्यापूर्वी इतर भागातील रस्त्यांच्या कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
    Published by:News18 Desk
    First published: