साडी नेसून 'भाभीजीं'चा हरियाणवी गाण्यावर जबरदस्त डान्स, VIDEO सोशल मीडियावर तुफान हिट

हरियाणवी गाण्यावर भाभाजींनी केलेला (bhabhi ji dance on haryanvi song) व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सध्या हरियाणवी गाण्यावर व्हिडिओ बनवण्याचा ट्रेंडच सुरू आहे.

हरियाणवी गाण्यावर भाभाजींनी केलेला (bhabhi ji dance on haryanvi song) व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सध्या हरियाणवी गाण्यावर व्हिडिओ बनवण्याचा ट्रेंडच सुरू आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 जून : आजकाल सोशल मीडियावर डान्स व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत (Social Media Viral) आहेत. नवीन आलेल्या गाण्यांवर अनेकजण आपल्या स्टाईलमध्ये डान्स करतात आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. काही व्हिडिओ मग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. असाच एक जबरदस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हरियाणवी गाण्यावर भाभाजींनी केलेला (Bhabhi Ji Dance on Haryanvi Song) व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सध्या हरियाणवी गाण्यावर व्हिडिओ बनवण्याचा ट्रेंडच सुरू आहे. ना लोड पडे हथियारों की...' हे गाणे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोक या गाण्यावर डान्स व्हिडिओ बनवून व्हायरल करत आहेत. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भाभाजी आपल्या घराच्या टेरेसवर मस्त डान्स करताना दिसत आहेत. हरियाणवी गाण्यावर नाचताना भाभीजींनी असा शानदार डान्स केला की पाहणाऱ्या सर्वांना त्यांच्या अदांची जणू भूरळ पडली. भाभीजींचा डान्स इंटरनेटवर व्हायरल
  View this post on Instagram

  A post shared by Bold Meera (@boldmeeraswag)

  भाभाजींच्या डान्सवर लोक फिदा भाभीजींच्या सुपरहिट डान्सला अनेकांनी दाद दिली आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला असून भाभाजींचा अंदाज पाहून अनेकजण या डान्सवर फिदा झाले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर बोल्ड मीरा नावाच्या एका खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. हे वाचा - VIDEO:’बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील’, चक्क नऊवारी साडीत किशोरी शहाणेंचा धम्माल डान्स या शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनेक ट्रेंडिंग हॅशटॅग्स आहेत. कमेंट बॉक्समध्ये तर अनेक प्रकारच्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ असल्याच्या काहींनी कमेंट करत भाभाजींना लोकांनी प्रोत्साहन दिलं आहे. व्हिडिओला पाच लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत आणि 90 लाख वेळा पाहिलं गेलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: