कोरोनाच्या संकटात लग्नाचा घाट; एकमेकांना हार घालत बेडकांच्या नव्या जीवनाला सुरुवात, पाहा VIDEO

कोरोनाच्या संकटात लग्नाचा घाट; एकमेकांना हार घालत बेडकांच्या नव्या जीवनाला सुरुवात, पाहा VIDEO

2019 मध्ये असाच एक विवाह सोहळा कर्नाटकमध्ये रंगला होता. योगायोग किंवा नशीबाचा भाग म्हणा, अतिवृष्टी झाल्याने अवघ्या दोन महिन्यांत या दोन्ही बेडकांचा घटस्फोट झाला होता.

  • Share this:

त्रिपुरा, 6 मे : सर्वत्र चांगला पाऊस व्हावा, पीक-पाणी मुबलक यावे, या अपेक्षाने ग्रामीण भागात आजही पारंपारिक पध्दतीने पर्जन्य देवतेची (Rain God) पूजा केली जाते. बेडकांचं लग्न लावणं, ही त्यातील एक परंपरा. प्रामुख्याने शेतकरी, शेतमजूर या परंपरा आजही जपताना दिसतात. दुष्काळाच्या झळा बसू नयेत, पावसाअभावी पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वी अशा पारंपारिक गोष्टींचे आयोजन ग्रामीण भागात केले जाते.

देशभरात ही परंपरा वैविध्यपूर्ण पध्दतीने जपली गेली आहे. एकीकडे देश कोरोनामुळे (Corona) त्रस्त असताना दुसरीकडे त्रिपुरातील एक गाव पावसाच्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी दोन बेडकांचा लग्नविधी (Frogs Marrige ceremony) करण्यात व्यस्त आहेत. पश्चिम त्रिपुरातील (Tripura) आदिवासी भागातील चहाच्या मळ्यामधील कामगारांनी बॅंजर बाय (बेडूक विवाह) या पारंपारिक कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. या अंतर्गत दोन बेडकांचे लग्न लावण्यात आले. यावेळी नदीच्या पाण्याने दोन्ही बेडकांना स्नान घालण्यात आले तसेच त्यांना लग्नासाठी फॅन्सी कपडे घालण्यात आले. त्यानंतर त्यांचा विवाह सोहळा पार पडला.

हे ही वाचा-OMG! 2026 ला जग अंधारात बुडणार? टाइम ट्रॅव्हलरच्या दाव्याने वाढलं टेन्शन

या विवाह सोहळ्याचा व्हिडीओ एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने शूट केला असून तो सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विशेष कपडे परिधान केलेल्या दोन बेडकांना महिलांनी आपल्या हातात धरले असून, त्यांचा विवाह लावताना दिसत आहे. हिंदू विवाह परंपरेनुसार, यावेळी दोन्ही बेडकांनी एकमेकांना हार घातला. यावेळी नर बेडकाने परंपरेनुसार मादी बेडकाला सिंदूरलावत आपली पत्नी म्हणून स्विकार केले. हे विलक्षण दृश्य भारतासाठी नवीन नाही. वृत्तानुसार, हिंदू धर्मात पर्जन्य देवता भगवान इंद्र यांना प्रसन्न करण्याची ही प्रथा आहे. बॅंजर बाय (Banger Biye) या पारंपारिक सोहळ्यात ग्रामस्थांनी बेडकांचे लग्न लावत यंदा चांगला पाऊस पडू दे आणि चहाच्या मळ्यांचे (Tea Garden) दुष्काळापासून संरक्षण होऊ दे अशी प्रार्थना पर्जन्य देवतेला केली.

2019 मध्ये असाच एक विवाह सोहळा कर्नाटकमध्ये रंगला होता. चांगला पाऊस व्हावा, यासाठी कर्नाटकातील उड्डपी येथे मे महिन्यात दोन बेडकांचे लग्न लावण्यात आले होते. योगायोग किंवा नशीबाचा भाग म्हणा, अतिवृष्टी झाल्याने अवघ्या दोन महिन्यांत या दोन्ही बेडकांचा घटस्फोट झाला होता. 2018 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्या ललिता यादव यांनी मध्यप्रदेशात आषाढ उत्सवाचे आयोजन करुन त्यात दोन बेडकांचे लग्न लावले होते. जोरदार पाऊस पडून प्रदेश सुपीक व्हावा, असा या मागील उद्देश होता.

First published: May 6, 2021, 8:14 PM IST

ताज्या बातम्या