'इंदिरानगर का गुंडा' द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO

'इंदिरानगर का गुंडा' द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO

राहुल द्रविडनंतर (Rahul Dravid) जवगाल श्रीनाथ (Javagal Srinath), व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) मणिंदर सिंग (Maninder Singh) आणि साबा करीम (Saba Karim) यांचा एका नवा अवतार समोर आला आहे

  • Share this:

मुंबई, 2 मे: आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी केलेल्या एका जाहिरातीमध्ये राहुल द्रविडचा पारा चांगलाच चढला होता. 'इंदिरानगर का गुंडा हूं मै' असं म्हणत ट्रॅफिकमध्ये अडकलेला राहुल द्रविड समोरच्या गाडीवर बॅटनं मारत असलेला व्हिडीओ प्रचंड गाजला. CRED या क्रेडिट कार्ड बिल पेमेंट कंपनीसाठी द्रविडनं ही जाहिरात केली होती.

द्रविडच्या गाजलेल्या जाहिरातीनंतर  जवगाल श्रीनाथ (Javagal Srinath), व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) मणिंदर सिंग (Maninder Singh) आणि साबा करीम (Saba Karim) यांचा एका नवा अवतार समोर आला आहे. 1980 आणि 1990 च्या दशकातील हे सर्व क्रिकेटपटू आहेत. गंभीर क्रिकेटपटू अशी त्यांची ओळख आहे.

या व्हिडीओमध्ये या चौघांचाही आजवर कुणीही कल्पना केली नसेल असा अवतार पाहयला मिळत आहे. या सर्वांनी एक बॉय बँड (Boy Band) तयार केला असून ते एका इंग्रजी गाण्यावर थिरकत आहेत. रॉकस्टारच्या स्टाईलनं  त्यांनी हे गाणं गायलं आहे.

टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. " वेंकी भाई, एक कोच म्हणून तुम्हाला मैदानात ऐकलं आहे. आता स्टेडियममध्ये जाताना तुमचं गाणं ऐकत आहे. ' असं ट्विट रोहितनं केलं आहे.

रोहित शर्मासह सर्वच क्रिकेट फॅन्सना या खेळाडूंचा नवा अवतार आवडला आहे. आजवर कधीही कल्पना न केलोल्या रुपात या क्रिकेटपटूंना सादर करणाऱ्या या जाहिरातीचं सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड कौतुक होत असून ही जाहिरात चांगलीच व्हायरल झाली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 2, 2021, 11:02 AM IST

ताज्या बातम्या