Jack Ma यांची कंपनी डबघाईला; अरबपती एका रात्रीत कसे झाले उद्ध्वस्त

जॅक मा यांच्या कंपनीचा शेवट इतका दुर्देवी होईल, असा विचार कुणी स्वप्नातही केला नसेल. अशा दुःखद शेवटाविषयी जॅक मा यांनी देखील विचार केला नसेल. केवळ वर्षभरातच चीनमधील प्रसिध्द उद्योगपती जॅक मा आणि त्यांची कंपनी कोसळून गेली.

जॅक मा यांच्या कंपनीचा शेवट इतका दुर्देवी होईल, असा विचार कुणी स्वप्नातही केला नसेल. अशा दुःखद शेवटाविषयी जॅक मा यांनी देखील विचार केला नसेल. केवळ वर्षभरातच चीनमधील प्रसिध्द उद्योगपती जॅक मा आणि त्यांची कंपनी कोसळून गेली.

  • Share this:
नवी दिल्ली, 12 जून : चिनी उद्योगपती जॅक मा (Jack Ma) हे नाव कालपर्यंत उद्योग जगतातील (Business Industry) एक चमकणारं नाव होतं. जगभरात त्यांच्या नावाचा डंका वाजत होता. अनेक युवक जॅक मा यांच्या कंपनीत नोकरीची स्वप्न बघत होते, तर तरुण उद्योजक त्यांना आपलं प्रेरणास्थान मानत होते. पण आता हे नाव कुठेतरी लुप्त होत आहे. काही वर्षांपूर्वी चीनला जॅक मा यांच्यावर गर्व होता, तोच चीन (China) आता त्यांचं अस्तित्व मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. जॅक मा यांच्या कंपनीचा शेवट इतका दुर्देवी होईल, असा विचार कुणी स्वप्नातही केला नसेल. अशा दुःखद शेवटाविषयी जॅक मा यांनी देखील विचार केला नसेल. केवळ वर्षभरातच चीनमधील प्रसिध्द उद्योगपती जॅक मा आणि त्यांची कंपनी कोसळून गेली. जॅक मा हे कोण आहेत? एका वर्षापूर्वी जॅक मा हे चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Rich Businessman) होते. जॅक मा चीनमधील सर्वात मोठी टेक कंपनी अलीबाबा (Alibaba) आणि जगातील सर्वात मोठ्या फिनटेक कंपनी द अँट ग्रुपचे (The Ant Group) निर्माते आहेत. त्यांचा व्यवसाय जगभरात मोठ्या वेगाने विस्तारत होता. उद्योग जगतात ते खूप प्रसिध्द होते. अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन आणि गुगल वगळता कोणत्याही अमेरिकी कंपन्यांपेक्षा अलिबाबाची किंमत सर्वाधिक होती. इतकंच नाही, तर ते एक जागतिक स्तरावरील व्यक्तिमत्व होते. सर्वेक्षणानुसार, चीनबाहेर ते राष्ट्रपती शी जिंगपिंग (Xi Jinping) यांच्या तुलनेत अधिक प्रसिध्द होते. संपत्तीबाबत असो किंवा प्रसिध्दी बाबत जॅक मा यांचं नाव जेफ बेजोस, एलन मस्क आणि बिल गेट्स यांच्या सारख्या दिग्गजांपूर्वी घेतलं जात होतं. इनोव्हेशनच्या दुनियेतील जॅक मा यांचं युग - इनोव्हेशन जगाबाबत जॅक मा यांचे विचार कमालीचे होते. चिनी माध्यमांमध्ये जॅक मा यांना देशातील विस्तारलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एरा ऑफ मा असं म्हटलं जायचं. पण एका वर्षात सारं काही बदलून गेलं. जॅक मा यांचं नशीब पालटलं आणि सारं काही विस्कटून गेलं. जॅक मा यांच्या संपत्तीला धक्का बसला. जगभरात त्यांना अपमानित केलं जाऊ लागलं. सध्या श्रीमंतांच्या यादीतून जॅक मा हे गायब झाले आहेत. चिनी माध्यमांमध्ये (China Media) ना जॅक मा यांची चर्चा होते, ना त्यांच्या कंपन्यांची. आता चर्चा होते ती केवळ जॅक मा आणि त्यांच्या कंपन्यांच्या दुरावस्थेची.

(वाचा - कोरोना काळात 28 टक्क्यांनी वाढले Online Fraud, देशाचं 25 हजार कोटींचं नुकसान)

अलीबाबा आणि अँट ग्रुपचं नुकसान - चीनच्या राष्ट्रपतींविषयी केलेलं एक वक्तव्य त्यांना इतका मोठा फटका देऊन गेलं, की केवळ 8 महिन्यांमध्ये त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. इतकंच नाही, तर श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रम घसरला. यापूर्वी अलिबाबाचं व्हॅल्यूएशन 857 अब्ज डॉलर होतं, त्यात घट होऊन ते 588 अब्ज डॉलरवर आलं. अँट ग्रुपचे व्हॅल्यूएशन (Valuation) 470 अब्ज डॉलर होतं. ते देखील घटून 108 अब्ज डॉलरवर आलं. चीनी प्रशासनाने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये एंट ग्रुपच्या सुमारे 37 अब्ज डॉलरच्या आयपीओवर स्थगिती आणली होती. यामुळे जॅक मा यांचं मोठं नुकसान झालं. चीन सरकारवर केलेली टिका ठरली अडचणीची - जॅक मा यांनी मागील वर्षी चिनी राष्ट्रपतींवर टिका केली होती. यानंतर जॅक मा यांचे वाईट दिवस सुरू झाले. चीनी सरकारच्या धोरणांवर टिका केल्यानंतर त्यांच्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात आली. हळूहळू त्यांच्या कंपन्या निशाण्यावर आल्या. प्रथम एंट ग्रुपचे आयपीओ (IPO) रद्द करण्यात आले, त्यानंतर कंपनीचा व्यवसाय बुडाला. यामुळे नुकसानीत भर पडली. जॅक मा यांचं नेटवर्थ (Networth) घटलं. हळूहळू जॅक मा यांचं त्यांच्या नेटवर्कवरील नियंत्रण सुटू लागलं आहे. त्यांना आपली भागीदारी विकावी लागत आहे.

(वाचा - हाय सिक्योरिटी असूनही कसे लीक होतात WhatsApp Chat, वाचा काय आहे कारण)

जॅक मा असं काय बोलले होते? जॅक मा यांनी 24 ऑक्टोबर 2020 मध्ये चीनमधील नोकरशाहीवर टिका केली होती. त्यांनी चीनच्या आर्थिक नियमकांवर आणि सरकारी बँकांवर कडक ताशेरे ओढले होते. इतकंच नाही, तर त्यांनी चिनी बॅंकांना तारण ठेवून काम करणारी संस्था म्हणून देखील संबोधलं. त्यानंतर युवक आणि नव उद्योजकांना दाबून टाकणाऱ्या अशा यंत्रणेत बदल करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली होती.
Published by:Karishma Bhurke
First published: