Google, Facebook आणि Instagram अशी घेतात तुमची माहिती, एका सेटिंगद्वारे करा बदल

अनेक वेबसाईट आणि अ‍ॅप्स स्वत:चं ही माहिती गुगलशी शेअर करतात. याचनुसार युजरला अ‍ॅड दिसतात. याला अ‍ॅड पर्सनलायजेशन म्हणतात. म्हणजे एखाद्या युजरची आवड कशात आहे, त्यानुसार जाहिराती दाखवल्या जातात. परंतु तुम्ही हे रोखू देखील शकता.

अनेक वेबसाईट आणि अ‍ॅप्स स्वत:चं ही माहिती गुगलशी शेअर करतात. याचनुसार युजरला अ‍ॅड दिसतात. याला अ‍ॅड पर्सनलायजेशन म्हणतात. म्हणजे एखाद्या युजरची आवड कशात आहे, त्यानुसार जाहिराती दाखवल्या जातात. परंतु तुम्ही हे रोखू देखील शकता.

  • Share this:
    नवी दिल्ली, 12 जून : गुगल (Google), फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) युजर्सची अनेकदा माहिती घेत असतात. एखाद्या युजरने काय सर्च केलं, कोणती वेबसाईट किंवा अ‍ॅप ओपन केलं, तिथे काय पाहिलं, किती वेळ घालवला अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात. अनेक वेबसाईट आणि अ‍ॅप्स स्वत:चं ही माहिती गुगलशी शेअर करतात. याचनुसार युजरला अ‍ॅड दिसतात. याला अ‍ॅड पर्सनलायजेशन म्हणतात. म्हणजे एखाद्या युजरची आवड कशात आहे, त्यानुसार जाहिराती दाखवल्या जातात. परंतु तुम्ही हे रोखू देखील शकता. Off Facebook Activity - तुम्ही अ‍ॅप्स किंवा वेबसाईटची हिस्ट्री क्लियर करू शकता. यासाठी Off Facebook Activity बंद करण्याचा पर्याय दिला जातो. यामुळे त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला माहिती दिली जाईल, की तुमच्या अकाउंटशी शेअर कोणती माहिती डिस्कनेक्ट करावी. इथे युजर कोणत्या कंपनीशी अ‍ॅक्टिव्हिटी शेअर करू इच्छित नाही, तेदेखील सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर प्लॅटफॉर्म तुम्हाला याबाबत अ‍ॅड दाखवणं बंद करेल. Coronaउपचारबाबत एप्रिल-मेमध्ये Facebook,Twitterने पोहोचवली दिशाभूल करणारी माहिती अ‍ॅड बंद करण्यासाठी - फेसबुक सेटिंगमध्ये Your Facebook Information मध्ये जा आणि Off-Facebook Activity वर क्लिक करा. हा पर्याय ऑफ करता येईल. इथे any future activity in your account ऑफ करा. तसंच हिस्ट्रीदेखील क्लियर करा. फोनला Password नसला तरी कोणी पाहू शकत नाही तुमच्या पर्सनल गोष्टी; ही आहे ट्रिक काय होईल बदल - एकदा युजरने हे ऑफ केल्यानंतर आणि डेटा क्लियर केल्यानंतर, युजरने कोणत्या वेबसाईट किंवा अ‍ॅपला व्हिजिट केलं आणि तिथे काय केलं ही माहिती Facebook वरुन डिलीट होते.
    Published by:Karishma Bhurke
    First published: