WTC Final : टीम इंडियाने या 5 खेळाडूंना केलं बाहेर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) 15 सदस्यीय टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या 20 खेळाडूंपैकी फायनलसाठी 15 जणांना निवडण्यात आलं आहे, तर 5 खेळाडूंना बाहेर बसावं लागणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) 15 सदस्यीय टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या 20 खेळाडूंपैकी फायनलसाठी 15 जणांना निवडण्यात आलं आहे, तर 5 खेळाडूंना बाहेर बसावं लागणार आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 15 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) 15 सदस्यीय टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या 20 खेळाडूंपैकी फायनलसाठी 15 जणांना निवडण्यात आलं आहे, तर 5 खेळाडूंना बाहेर बसावं लागणार आहे. बाहेर ठेवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांचासारखी बडी नावं आहेत. केएल राहुलने सराव सामन्यात शानदार शतक केलं, पण तरीही त्याल फायनलसाठी निवडण्यात आलं नाही. भारतीय टीमने ओपनर म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची निवड केली आहे. तसंच काऊंटी क्रिकेटमध्ये खेळलेल्या हनुमा विहारीलाही संधी देण्यात आली आहे. 15 सदस्यांच्या या टीममध्ये ऋद्धीमान साहा, मोहम्मद सिराज आणि उमेश यादवही आहेत. फायनलसाठी भारतीय टीम रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज हे 5 खेळाडू बाहेर भारतीय टीमने केएल राहुल, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना फायनलसाठी निवडलेलं नाही. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत. आयपीएलमध्ये पंजाबकडून ओपनिंग करणाऱ्या या दोघांनी उत्कृष्ट बॅटिंग केली होती. केएल राहुलने सराव सामन्यात शतक केलं, तर मयंक अग्रवालचं टेस्ट रेकॉर्डही चांगलं आहे. मयंकने टेस्ट क्रिकेटमध्ये दोन द्विशतकंही केली आहेत, पण तरीही विराटने या दोघांवर विश्वास दाखवला नाही. तर दुसरीकडे आयपीएल आणि इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये अपयशी ठरलेल्या शुभमन गिलला मात्र संधी देण्यात आली आहे. गिल रोहित शर्मासोबत ओपनिंगला येईल.
    Published by:Shreyas
    First published: