WTC Final : विजयी टीमला विराटच्या IPL पगारापेक्षाही कमी पैसे मिळणार

आयसीसीने (ICC) पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) जिंकणाऱ्या टीमसाठीची रक्कम घोषित केली आहे. विजेत्या टीमला मिळणारी ही रक्कम विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) मिळणाऱ्या मानधनापेक्षाही कमी आहे.

आयसीसीने (ICC) पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) जिंकणाऱ्या टीमसाठीची रक्कम घोषित केली आहे. विजेत्या टीमला मिळणारी ही रक्कम विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) मिळणाऱ्या मानधनापेक्षाही कमी आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 14 जून : आयसीसीने (ICC) पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) जिंकणाऱ्या टीमसाठीची रक्कम घोषित केली आहे. हा मुकाबला जिंकणाऱ्या टीमला 11.72 कोटी रुपये मिळणार आहे, तर उपविजेत्या टीमला 5.85 कोटी रुपये मिळतील. विजेत्या टीमला मिळणारी ही रक्कम विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) मिळणाऱ्या मानधनापेक्षाही कमी आहे. विराटला एक आयपीएल खेळून 17 कोटी रुपये मिळतात. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. केन विलियमसन (Kane Williamson) आणि विराट कोहलीला अजूनपर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे हे दोन्ही कर्णधार या सामन्यात जिंकायचा पुरेपुर प्रयत्न करतील. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार जर मॅच टाय किंवा ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल, त्यामुळे दोन्ही टीमना समसमान रक्कम दिली जाईल, त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडला जवळपास प्रत्येकी 8.78 कोटी रुपये मिळतील. एवढच नाही तर विजयी टीमला आयसीसीकडून गदाही मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरच्या ऑस्ट्रेलियाला 3.3 कोटी रुपये, चौथ्या क्रमांकावरच्या इंग्लंडला 2.5 कोटी रुपये, पाचव्या क्रमांकावरच्या पाकिस्तानला 1.5 कोटी रुपये मिळतील, तर इतर 4 टीमना प्रत्येकी 73-73 लाख रुपये देण्यात येतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी 23 जुलैचा दिवस रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे. जर पाच दिवस पूर्ण खेळ झाला नाही, तर सहाव्या दिवसाचा वापर केला जाईल, पण याचा निर्णय मॅच रेफ्री घेतील. 9 टीम झाल्या होत्या सहभागी टेस्ट क्रिकेटचा रोमांच वाढवण्यासाठी आयसीसीने 2019 साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरूवात केली होती. या स्पर्धेत एकूण 9 टीमनी सहभाग घेतला होता. प्रत्येक टीम 6-6 सीरिज खेळणार होती, यातल्या 3 सीरिज घरच्या मैदानात तर 3 सीरिज परदेशात खेळायच्या होत्या. पण कोरोनामुळे अनेक सीरिज स्थगित कराव्या लागल्या. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या आणि न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर राहिली. 2023 ते 2031 या कालावधीमध्ये आयसीसी ही स्पर्धा आणखी चारवेळा आयोजित करणार आहे. आयसीसी चार प्रकारच्या स्पर्धा आयोजित करतं. यामध्ये वनडे वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप यांचा समावेश आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, पण आता 2025 आणि 2029 मध्ये पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली तर आयसीसीच्या चारही स्पर्धा जिंकणारी भारतीय टीम पहिलीच ठरेल.
    Published by:Shreyas
    First published: