
डॉक्टर व्यवस्थित काळजी घेत नसल्यानं तिनं आपल्या पतीला मायागंज रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे परिस्थिती आणखीच भयंकर होती. ICU मध्ये एकापाठोपाठ एक रुग्णाचा मृत्यू होत होता मात्र कोणीच कोणाचं काही ऐकायला तयार नव्हतं. रुचीनं सांगितलं, की एक व्यक्ती डॉक्टर डॉक्टर ओरडत बेडवरुन खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला आणि रक्त वाहू लागलं. मात्र, तरीही डॉक्टरांना काहीच फरक पडला नाही. डॉक्टर आणि नर्स आपल्या रुममध्ये लाईट ऑफ करुन चित्रपट पाहात बसतात मात्र कोणीच रुग्णांना पाहायला येत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. रुचीची मोठी बहिण ऋचा सिंहनं सांगितलं, की रुग्णालयात डॉक्टर आणि स्टाफ घाणेरड्या नजरेनं पाहायचे. इतकंच नाही तर वारंवार शरीराला हात लावण्याचा प्रयत्न करायचे. मायागंज रुग्णालयातही परिस्थिती गंभीर झाल्यानं रुग्णाला एअर अॅमबुलन्सनं दिल्लीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती वेळेवर न आल्यानं पाटणामधीलच एका खासगी रुग्णालयात रुग्णाला भर्ती करण्यात आलं. आरोप आहे, की इथेही रुग्णांना लुटलं गेलं. इतकंच नाही तर रुग्णालयानं ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं सांगत आपल्या रुग्णालयात दाखल रुग्णांना ५०-५० हजारात ऑक्सिजन सिलेंडर विकले. रोशन आणि रुची नोएडामध्ये राहायचे. रोशन सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगलं पॅकेज होतं. मात्र, पैसे असतानाही त्याला मृत्यूआधी प्रचंड यातना आणि त्रास सहन करावा लागला. रुचीचा असा आरोप आहे, की रोशनचा मृत्यू कोरोनानं कमी आणि रुग्णालयातील अव्यवस्था तसंच ऑक्सिजन संपण्याच्या भीतीनं जास्त झाला. या दोघांनी पाच वर्षाआधीच लग्नगाठ बांधली होती. आता पतीच्या आठवणीत रुचीचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.ये महिला रोते हुए बता रही है कि डॉक्टर उसके साथ छेड़खानी करता था, लेकिन वो कुछ नहीं कर पाती थी क्योंकि उसी अस्पताल में पति एडमिट था. पति की मौत के बाद महिला ने ये बात कही है.
हम समाज के तौर पर हर दिन धंसते जा रहे हैं. pic.twitter.com/EM9sldWRhF — Ranvijay Singh (@ranvijaylive) May 10, 2021