Covid Vaccine: 15 जूनपासून भारतातील या रुग्णालयात Sputnik V लस मिळणार

Covid Vaccine Sputnik V: रशियाने 11 ऑगस्ट 2020 रोजी Sputnik V या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली. त्यानंतर डीसीजीआयने एसआयआयला भारतात स्पुटनिक व्ही तयार करण्यास मान्यता दिली.

Covid Vaccine Sputnik V: रशियाने 11 ऑगस्ट 2020 रोजी Sputnik V या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली. त्यानंतर डीसीजीआयने एसआयआयला भारतात स्पुटनिक व्ही तयार करण्यास मान्यता दिली.

  • Share this:
    नवी दिल्ली, 13 जून: दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात (Indraprastha Apollo Hospital, Delhi) 15 जून पासून रशियन निर्मितीची कोरोना प्रतिबंधक असलेली स्पुटनिक व्ही (Russian Sputnik V vaccine) या लसीचे डोस देण्याची शक्यता आहे. न्यूज एजन्सी एएनआयने रविवारी आपल्या सूत्रांच्या आधारे माहिती दिली की, डॉ. रेड्डीजच्या लॅबोरेटरीने रशियन डायरेक्ट इन्हेस्टमेंट फंड सोबत भारतात स्पुटनिक व्ही लसीचे 12.5 कोटी डोसची विक्री करण्याचा करार केला आहे. स्पुटनिक व्ही (Sputnik V vaccine) लस साठविण्याकरिता तज्ञांची आवश्यकता असते आणि उणे 0 ते 20 डिग्री अंश सेल्सिअस तापमानावर त्याची साठवणूक केली जाते. स्पुटनिक व्ही लस गामेलेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केली आहे. कोविड विरुद्ध ही लस 94.3 टक्के प्रभावी आहे. तांत्रिक त्रृटीमुळे महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा कोरोनामुक्त सीरम इन्स्टिट्यूटला भारतात स्पुटनिक व्ही लस उत्पादनासाठी मान्यता मिळाली आहे. 4 जून रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआयने) काही विशिष्ट परिस्थितींसह भारतात अभ्यास, चाचणी आणि विश्लेषणासाठी स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लस निर्मितीची सीरमला मान्यता दिली. स्पुटनिक व्ही लसींचे 1.5 लाख डोसचे पहिली खेप भारताला मिळाली आहे. 1 मे रोजी रशियाकडून भारताला पहिली खेप मिळाली होती. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने सांगितले की, रशियन निर्मित स्पुटनिक व्ही लसीचे 1.5 लाख डोसची पहिली खेप हैदराबाद येथे पोहोचली आहे. तर दुसरी आणि सर्वात मोठी खेप 30 लाख लसींची होती जी 1 जून रोजी चार्टर्ड विमानाने हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आली.
    Published by:Sunil Desale
    First published: