पेट्रोल टाकून पत्नीचा जीव घेण्यासाठी आला पण तिनेचं वाचवलं, काय घडलं नेमकं?

पेट्रोल टाकून पत्नीचा जीव घेण्यासाठी आला पण तिनेचं वाचवलं, काय घडलं नेमकं?

आगीमुळे पती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 जून : घरोघरी मातीच्या चुली तस प्रत्येक घरात पती-पत्नीमध्ये होणारी भांडणं ही फार सर्वसामान्य गोष्ट समजली जाते. लॉकडाऊनमध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून हत्येपर्यंत अनेक घटना समोर येत आहे. दिल्लीतील त्रिलोकपुरी इथली घटना मात्र हैराण करणारी आहे. रागाच्या भरात पत्नीची पेट्रोल टाकून हत्या करण्यासाठी आलेल्या पतीलाच त्याच्या पत्नीनं संकटातून वाचवल्याचा धक्कादायक घडला. आगीमुळे पती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन लागू होण्यापूर्वी आरिफ मेरठला गेला. लॉकडाउनमुळे तो तिथेच अडकला. लॉकडाउन उघडल्यानंतर तो दिल्लीला परतला. आरिफ आणि त्यांच्या पत्नीचा अनेकदा वाद होत असे. मेरठहून परत आल्यानंतर 35 वर्षीय आरिफने हा वाद कायमचा संपविण्याची निर्णय घेतला. यासाठी त्यानं पत्नीला आणि मग स्वत:ला पेट्रोल टाकून जळण्याचा निश्चय केला.

पत्नीला मारण्यासाठी त्यानं पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला. पत्नीला पेटवून देण्यासाठी आरिफ कुठून पेट्रोल घेऊन आला. मंगळवारी त्याने पत्नीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने स्वत: वर पेट्रोलही शिंपडले. नवऱ्याचा हेतू लक्षात घेऊन पत्नीने आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण तेव्हड्यात आरिफच्या कपड्यांनी पेच घेतला. पत्नीनं आरिफच्या अंगावर ब्लॅकेट टाकून आग विझवली. त्यानंतर जखमी झालेल्या आरिफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचा-ट्रेन खरेदी करण्यासाठी तरुणानं मागितलं 300 कोटींचं लोन पुढे काय घडलं वाचा

हे वाचा-अजगराच्या तावडीतून तरुणानं अशी केली हरणाची सुटका, VIDEO VIRAL

First published: June 4, 2020, 7:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या