केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर

Corona Update: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देशातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी (New Corona Case) जाहीर केली आहे. ही आकडेवारी दिलासादायक असल्याचं दिसतंय.

Corona Update: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देशातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी (New Corona Case) जाहीर केली आहे. ही आकडेवारी दिलासादायक असल्याचं दिसतंय.

  • Share this:
    नवी दिल्ली, 12 जून: कोरोना व्हायरस देशात (Coronavirus in India) आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. देशातून कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देशातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी दिलासादायक असल्याचं दिसतंय. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry of India) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 70 दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. (Covid-19 Active Cases Latest Updates) गेल्या 24 तासात देशात 84, 332 नव्या (New Corona Case) कोरोनाबाधित रुग्णांची नव्यानं भर पडली आहे. 4002 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 21 हजार 311 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. आकडेवारीनुसार, देशात सध्या 40 हजार 981 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याआधी 1 एप्रिलला देशात 81 हजार 466 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. हेही वाचा- डोमिनिका हायकोर्टानं दिला निर्णय, मेहुल चोक्सीला आणखी एक झटका शनिवारी (12 जून 2021) सकाळी 8 वाजता मंत्रालयाने कोरोनाचे आकडेवारी जाहीर केले. गेल्या 24 तासात एकूण नवे रुग्ण - 84,332 गेल्या 24 तासात कोरोनामुक्त रुग्ण- 1,21,311 गेल्या 24 तासात एकूण मृत्यू - 4,002 देशामध्ये संक्रमित कोरोनाची एकूण संख्या - 2,93,59,155 देशात आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 2,79,11,384 देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या - 3,67,081 भारतात सध्या कोरोनाची एकूण अॅक्टिव्ह रुग्ण - 10,80,690 एकूण लसीकरण - 24,96,00,304 कोरोना चाचण्यांनी देशात 37 कोटी 62 लाखांचा आकडा गाठला आहे. देशातील कोरोना मृत्यूदर 1.24 टक्क्यांवर पोहोचला असून रिकव्हरी रेट (Recovery Rate) 95 टक्क्यांहून जास्त आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचं प्रमाण 4 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून एकूण बाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: