VIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPE किट घालून लग्नात केला डान्स

VIDEO: कोरोना नियमांचा फज्जा; रुग्णवाहिका चालकाने PPE किट घालून लग्नात केला डान्स

रुग्णालयासमोरून लग्नाची वरात जात असताना एका रुग्णवाहिकेच्या चालकानं पीपीई किट परिधान करून वऱ्हाडींसोबत डान्स (ambulance driver dance in PPE kit) केला आहे.

  • Share this:

हल्द्वानी, 27 एप्रिल: सध्या भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची (Coronavirus in India) झपाट्यानं वाढ होतं आहे. देशात दिवसाला तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होतं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध तर काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊनही (Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. असं असताना नागरिकांचा हलगर्जीपणा कमी होताना दिसत नाहीये. होम क्वारंटाइन असणाऱ्या रुग्णाचे नातेवाईक मार्केटमध्ये बेधडक फिरताना दिसत आहे. तर दुसरीकडे लग्न संमारंभही अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. त्यामुळे देशाच्या चिंता वाढताना दिसत आहेत.

अशातचं कोव्हिड रुग्णवाहिकेचा एक चालक (Covid ambulance driver) भर वरातीसोबत डान्स (dance in Wedding) करताना दिसत आहे. रुग्णालयासमोरून लग्नाची वरात वाजत गाजत जात असताना संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाने पीपीई किट परिधान करून वऱ्हाडींसोबत डान्स (ambulance driver dance in PPE kit) केला आहे. या प्रकरानंतर लग्नातील वऱ्हाडीही अवाक् झाले होते. यानंतर काही काळासाठी अनेकांना काय करावं हेही सुचलं नाही.

हे वाचा-मोठा निर्णय! COVID रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांवर दाखल होणार गुन्हे

संबंधित घटना उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी याठिकाणी घडली आहे. यावेळी लग्नाची एक वरात हल्द्वानीतील सुशीला तिवारी रुग्णालयासमोरून जात होती. दरम्यान संबंधित रुग्णालयाच्या अॅम्ब्युलन्सचा चालक थेट पीपीई किट घालून डान्स करण्यासाठी वरातीत घुसला आहे. त्याने अशापद्धतीनं वरातीत डान्स केल्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. यावेळी वरातीत डान्स करणाऱ्या पाहुण्यांना काय करावं हेही सुचलं नाही. पण अशा पद्धतीनं रुग्णवाहिकेच्या चालकानं डान्स केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Published by: News18 Desk
First published: April 27, 2021, 12:20 PM IST

ताज्या बातम्या