उद्योग क्षेत्रातील मोठं पाऊल; नोकरीसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही

उद्योग क्षेत्रातील मोठं पाऊल; नोकरीसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही

दरवर्षी रोजगारासाठी मोठ्या संख्येने नागरिक गावातून शहरात येतात. येथे त्यांना मिळेत त्या परिस्थितीत राहून काम करावे लागते

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जून : आतापर्यंत असा विचार केला जात होता की आपल्याला जर देशातील कोणत्याही मोठ्या कंपनीत काम करायचे असेल तर महानगरांमध्ये किंवा देशातील मोठ्या शहरांमध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पण आता तो दिवस फार दूर नाही, जेव्हा खेड्यात राहूनही मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, आता मजुरांना शहरांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत किंवा झोपडपट्ट्यांमध्ये राहून दिवस काढावे लागणार नाही. मोठ्या कंपन्या स्वत: विविध गावात पोहोचून व्यवसाय सुरू करणार आहेत.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे नवे अध्यक्ष उदय कोटक यांनी गुरुवारी  पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, आता ग्रामीण ते शहरी असे नाही तर शहरी ते ग्रामीण भागात उलट स्थलांतर होत आहे. एक प्रकारे ते ग्रामीण शहरी संतुलन असेल. आता ग्रामीण भागातही जवळच रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे ते गावी कुटुंबासह राहू शकतील. त्यांना शहरातील झोपडपट्टी भागात राहावे लागणार नाही.

बड्या कंपन्या तेथे कारखाना उभारतील

उदय कोटक म्हणाले की, आता मोठ्या कंपन्यांनीही गावात जाऊन कारखाने उभारण्याबाबत गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली आहे. उद्योग संस्था म्हणून सीआयआय यास प्रोत्साहन देईल. सरकार सध्या सुधारणेबाबत बऱ्याच उपाययोजना करीत आहे आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी काम करण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये अशा प्रकारे पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत.

कुशल मजूर खेड्यांमध्येच मिळतील

ते म्हणतात की, यावेळी लाखो कुशल मजूर सध्या शहरांवरुन गावांत स्थलांतरित झाली आहेत. गावांमध्येच कारखाने सुरू केल्यास कुशल कारागिरांची कमतरता भासणार नाही. गरज भासल्यास त्यांचा कौशल्य विकास करता येईल, त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन अधिक कार्यक्षम करता येईल.

वर्क फ्रॉम होम असेल नवीन पर्याय

सीआयआय अध्यक्ष म्हणतात की, लॉकडाऊनने एक नवीन गोष्ट शिकविली आहे. ते म्हणजे घरातून काम करण्याची. ही एक नवीन पद्धत आहे जी भविष्यातही उपयोगी ठरेल. घरोघरी काम करणे खेड्यांमध्येही अडचणीचे ठरणार नाही कारण गावात ब्रॉडबँड प्रवेश आधीच झाला आहे.

First published: June 4, 2020, 4:24 PM IST

ताज्या बातम्या