Monsoon Update: उत्तरेकडे मान्सूनची वेगात वाटचाल; कोकणात पावसाचा इशारा, मुंबईत कशी असेल स्थिती?

Monsoon Update: महाराष्ट्र आणि मध्य भारतात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Monsoon) उत्तरेकडे वेगानं वाटचाल सुरू केली आहे. आज मान्सून दिल्ली, हरियाणा आणि पंजाबपर्यंत धडक मारणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे.

Monsoon Update: महाराष्ट्र आणि मध्य भारतात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Monsoon) उत्तरेकडे वेगानं वाटचाल सुरू केली आहे. आज मान्सून दिल्ली, हरियाणा आणि पंजाबपर्यंत धडक मारणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे.

  • Share this:
    मुंबई, 14 जून: महाराष्ट्र आणि मध्य भारतात काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Monsoon) उत्तरेकडे वेगानं वाटचाल सुरू केली आहे. काल मान्सूनने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाच्या अनेक भागांत दमदार हजेरी लावली आहे. आज मान्सून दिल्ली, हरियाणा आणि पंजाबपर्यंत धडक मारणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण देशाला व्यापणार आहे. 5 जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत मान्सूननं संपूर्ण राज्याला व्यापलं होतं. मुंबईत तर मान्सूननं दिमाखात आगमन करत मुंबईकरांना पुरतं झोडपून काढलं होतं. यानंतर आता मान्सूनने उत्तरेकडे प्रवास सुरू केला आहे. दरम्यान ईशान्य भारतातील बऱ्याच राज्यात पावसानं हजेरी लावली होती. मान्सूनने महाराष्ट्रातून पुढच्या दिशेनं मार्गक्रमण केलं असलं तरी राज्यात अद्याप बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. तर कोकणात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. कोकणात 4 दिवस पाऊस पुढील चार दिवस कोकणात जोरदार पावसाची (Rain in Konkan) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनचं कोकणात विविध ठिकाणी पावसाची सरी कोसळत आहेत. पुढील आणखी काही तास दक्षिण कोकणासह गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काय आहे मुंबईची स्थिती? कालपासून मान्सूनने मुंबईकरांना थोडासा दिलासा दिला आहे. तर मागील सहा तासांत मुंबईत कोठेही पावसाची नोंद झाली नाही. पण नवी मुंबई आणि ठाणे परिसरात मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. आज मुंबईत सरासरी 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published: