SBI ची नवी स्किम; फक्त 5000 रुपये गुंतवणुकीतून करा भरपूर कमाई, 11 मे आहे शेवटची तारीख

SBI ची नवी स्किम; फक्त 5000 रुपये गुंतवणुकीतून करा भरपूर कमाई, 11 मे आहे शेवटची तारीख

नव्या गुंतवणूकदाराला पैसे कमवायचे असतील तर याच फंडामध्ये पैसा लावायला पाहिजेत, असं तज्ज्ञ सांगतात.

  • Share this:

मुंबई, 06 मे : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) एक नवीन म्युच्युअल फंड योजना (Mutual fund) योजना आणली आहे. या योजनेचं नाव SBI Nifty Next 50 Index Fund आहे. SBI Mutual Fund च्या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 11 मे आहे. यामध्ये निफ्टीच्या 50 शेअर्समध्ये पैसे गुंतवले जातात. तुम्ही गुंतवणूक केल्यास जसजशी शेअर बाजारात तेजी येईल, तसतसे तुमचे पैसे वाढतील. तुम्ही फक्त 5 हजार रुपयांची गुंतवणूक (Investment) करून पैसे कमवू शकता. याबाबतचंवृत्तटीव्ही9हिंदीने दिलं आहे.

निफ्टी NSE च्या बेंचमार्क इंडेक्समध्ये 50 कंपन्या आहेत. त्यांच्या प्रदर्शनावरून (Performance) शेअर बाजारात तेजी अथवा मंदी येते. जर यामध्ये तेजी आली तर गुंतवणूकदारांना पैसे कमवता येतील. मात्र बाजारात घसरण झाल्यास त्याचा फटकाही बसू शकतो. मात्र कोणत्याही नव्या गुंतवणूकदाराला पैसे कमवायचे असतील तर याच फंडामध्ये पैसा लावायला पाहिजेत, असं तज्ज्ञ सांगतात.

हे वाचा - या सरकारी बँकेत तुमचं खातं आहे का? या चुकीमुळे होईल तुमचं अकाउंट रिकामं!

SBI च्या या फंडचे मॅनेजर रवी प्रकाश शर्मा आहेत. ते आधीपासूनच SBI-ETF Gold, SBI Nifty Index Fund, SBI-ETF SENSEX, SBI Gold Fund, SBI-ETF Nifty Bank, SBI-ETF BSE 100, SBI ETF Nifty Next 50, SBI– ETF Nifty 50, SBI ETF SENSEX NEXT 50, SBI ETF Quality, SBI Equity Minimum Variance Fund या स्कीम्स चालवत आहेत. यांचे रिटर्न चांगले आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाँग टर्ममध्ये पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.

या फंडामध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करता येते का?

तुम्ही यामध्ये एसआयपीच्या (systematic investment plan) माध्यमातून पैसा लावू शकता. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी एका वर्षासाठी एसआयपी सुरू करावी लागेल. एसआयपी हा म्युचुअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी सगळ्यात सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेसमेंट प्लॅन हा आपल्याला आपल्या आवडत्या म्युचुअल फंडमध्ये आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या हप्त्यात एक ठराविक रक्कम भरण्याचं स्वातंत्र्य देतो. ज्या लोकांना थेट शेअर मार्केटमध्ये (share market) गुंतवणूक करण्यात भीती वाटते, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे, असं एक्स्पर्ट्स सांगतात.

इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक का करावी?

ज्या गुंतवणूकदारांना शेअर्समध्ये गुंतवणूक करून लाँग टर्ममध्ये सामान्य किंवा जास्त रिटर्न पाहिजे आणि धोका पत्करायचा नाही, त्यांच्यासाठी इंडेक्स फंड उत्तम पर्याय आहे, असं एक्स्पर्ट्स सांगतात. मात्र हे पूर्णपणे रिस्क फ्री असतात असंही नाही. शेअर बाजारात घसरण झाल्यास तुमचा इंडेक्स फंड एनव्हीदेखील खाली जाईल. त्यामुळे तुम्ही बाजारात घसरण होण्याआधी तुमच्या इंडेक्स फंडमधील गुंतवणूक वाढवू शकता आणि पैसे डेट फंड, गोल्ड अथवा टर्मडिपॉझिटमध्ये शिफ्ट करू शकता.

हे वाचा - कोरोना काळात मोठा दिलासा! इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी RBI ने दिले 50,000 कोटी

गुंतवणूक करण्यासाठी असे इंडेक्स फंड निवडा ज्याचा एक्सपेन्स रेशिओ एक टक्क्यांपेक्षा कमी असेल. कारण तुम्हाला कमी गुंतवणुकीचे पर्याय पाहिजे असतील तर इंडेक्स फंड एक चांगला पर्याय आहे. तसंच येत्या काळात अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यास या फंडचा रिटर्न वाढेल आणि तुम्हाला चांगली रक्कम मिळेल.

First published: May 6, 2021, 4:23 PM IST

ताज्या बातम्या