Fuel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी गाठला उच्चांक, 25 दिवसात एवढं महागलं इंधन

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होत आहे. देशातील सर्वच शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती आसमंताला भिडल्या आहेत. गेल्या 25 दिवसात पेट्रोलचे दर 06.09 रुपयांनी महागले आहेत.

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होत आहे. देशातील सर्वच शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती आसमंताला भिडल्या आहेत. गेल्या 25 दिवसात पेट्रोलचे दर 06.09 रुपयांनी महागले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 जून: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol-Diesel Price Today) गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होत आहे. देशातील सर्वच शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती आसमंताला भिडल्या आहेत. गेल्या 25 दिवसात पेट्रोलचे दर 06.09 रुपयांनी महागले आहेत. दरम्यान आज सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. सोमवारी पेट्रोलच्या दरात (Petrol Price Today) 29 पैसे प्रति लीटरने वाढ करण्यात आली होती, तर डिझेल (Diesel Price Today) 30 पैशांनी महागलं होतं. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 102.58 रुपये आणि डिझेलचे दर 94.70 रुपये प्रति लीटर आहेत. 25 दिवसात किती महागलं इंधन? 4 मे रोजी झालेल्या वाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या आहेत. गेल्या 25 दिवसात पेट्रोलचे दर 06.09 रुपयांनी तर डिझेलचे दर 6.30 रुपयांनी महागले आहेत. अनेक शहरात डिझेलने उच्चांक गाठला आहे. तर देशातील अनेक महत्वाच्या शहरात पेट्रोलचे दर 102 रुपये प्रति लीटरपेक्षा अधिक आहेत. हे वाचा-आजपासून सोन्याच्या दागिन्यांसंदर्भातील हा नियम बदलला, उल्लंघन केल्यास होईल जेल कसे पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. देशातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर >> दिल्ली- पेट्रोल 96.41 रुपये आणि डिझेल 87.28 रुपये प्रति लीटर >> मुंबई- पेट्रोल 102.58 रुपये आणि डिझेल  94.70 रुपये >> कोलकाता- पेट्रोल 96.34 रुपये आणि डिझेल  90.12 रुपये >> चेन्नई- पेट्रोल 97.69 रुपये आणि डिझेल 91.92 रुपये >> पाटणा- पेट्रोल 98.49 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लीटर >> रांची- पेट्रोल 92.51 रुपये आणि डिझेल  92.13 रुपये प्रति लीटर >> लखनऊ- पेट्रोल 93.63 रुपये आणि डिझेल 87.68 रुपये प्रति लीटर >> बेंगळुरु- पेट्रोल 99.63 रुपये आणि डिझेल 92.52 रुपये प्रति लीटर >> जयपूर- पेट्रोल 103.03 रुपये आणि डिझेल 96.24 रुपये प्रति लीटर हे वाचा-UIDAI: कुणी तुमचं Aadhaar Card तर वापरत नाही ना? घरबसल्याच ठेवा वॉच >>श्रीगंगानगर- पेट्रोल 107 रुपये आणि डिझेल रिकॉर्ड 100 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त >> रीवा- पेट्रोल 106.81 रुपये आणि डिझेल 97.96 रुपये प्रति लीटर >> भोपाळ- पेट्रोल 104.59 रुपये आणि डिझेल  95.91 रुपये प्रति लीटर >> परभणी- पेट्रोल 104.92 रुपये आणि डिझेल 95.50 रुपये प्रति लीटर >> रायपूर- पेट्रोल 94.60 रुपये आणि डिझेल 94.40 रुपये प्रति लीटर >> गांधीनगर- पेट्रोल 93.54 रुपये आणि डिझेल 94.17 रुपये प्रति लीटर >> भुवनेश्वर- पेट्रोल 97.16 रुपये आणि डिझेल 95.11 रुपये प्रति लीटर >> गुरुग्राम- पेट्रोल 94.19 रुपये आणि डिझेल 87.87 रुपये प्रति लीटर >> नोएडा- पेट्रोल 93.74 रुपये आणि डिझेल 87.76 रुपये प्रति लीटर >> चंडीगड- पेट्रोल 92.73 रुपये आणि डिझेल 86.92 रुपये प्रति लीटर दररोज 6 वाजता बदलते पेट्रोल-डिझेलची किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: