EPFO च्या 6 कोटी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी, लवकरच खात्यात येतील PF च्या व्याजाचे पैसे; असा तपासा बॅलन्स

EPFO च्या 6 कोटी सब्सक्रायबर्ससाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या पीएफ खात्यामध्ये व्याजाचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये तुम्हाला 8.5 टक्के दराने व्याज मिळेल. अशावेळी जाणून घ्या तुमच्या खात्यात किती पैसे आहे

EPFO च्या 6 कोटी सब्सक्रायबर्ससाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या पीएफ खात्यामध्ये व्याजाचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये तुम्हाला 8.5 टक्के दराने व्याज मिळेल. अशावेळी जाणून घ्या तुमच्या खात्यात किती पैसे आहे

  • Share this:

    नवी दिल्ली, 15 जून: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 6 कोटी सब्सक्रायबर्ससाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या पीएफ खात्यामध्ये व्याजाचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये तुम्हाला 8.5 टक्के दराने व्याज मिळेल. ईपीएफओने अलीकडेच अशी माहिती दिली होती की, नोकरदार वर्गाच्या पीएफ (Provident Fund) खात्यामध्ये पुढील महिन्याअखेर 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर केले जाईल. अशावेळी तुमच्या खात्यामध्ये किती बॅलन्स आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. जाणून घ्या कशाप्रकारे तुम्हील तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता. आर्थिक वर्ष 2019-20 वर्षात 8.50 टक्के दराने पीएफवर व्याज मिळाले होते. 2018-19 मध्ये हा दर 8.55 टक्के होता. तर 2017-18 या आर्थिक वर्षात हा दर 8.65 टक्के होता. तुम्ही घरबसल्या तुमचा बॅलन्स तपासू शकता, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये व्याज जमा झालं आहे की नाही, हे तुम्हाला तपासता येईल. नोकरदार वर्गाला त्यांच्या पीएफमधील पैशांबाबत माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. आता ही रक्कम माहिती करुन घेणं अतिशय सोपं झालं आहे. आतापर्यंत तुम्ही ऑनलाइन बॅलन्स तपासणं किंवा पासबुक डॉउनलोड करता येत होतं. मात्र EPFO ने ग्राहकांना अधिक सुविधा देण्याअंतर्गत काही पावलं उचलली आहेत. तुम्ही एका SMS द्वारे देखील तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकता. याकरता तुम्हाला तुमचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणं आवश्यक आहे. तुम्हा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन मेसेज पाठवून PF Balance तपासता येईल. जाणून घ्या घरबसल्या पीएफ तपासण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. हे वाचा-आजपासून सोन्याच्या दागिन्यांसंदर्भातील हा नियम बदलला, उल्लंघन केल्यास होईल जेल 1. SMS च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स- SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे. 2. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक- याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. त्यावेळी तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता. हे वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी गाठला उच्चांक, 25 दिवसात एवढं महागलं इंधन 3. EPFO App च्या माध्यमातून- याकरता तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता. 4. Missed Call देण्यासाठी डायल करा हा क्रमांक-यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता

    Published by:Janhavi Bhatkar
    First published: