Post Office च्या या स्किममध्ये दररोज 95 रुपये जमा करुन मिळतील 14 लाख, वाचा काय आहे योजना

Post Office चा हा एंडोमेंट प्लॅन आहे. यात मनी बॅकसह मॅच्योरिटीवर एकरकमी रक्कम दिली जाते. 15 आणि 20 वर्षांसाठी ही पॉलिसी असते.

Post Office चा हा एंडोमेंट प्लॅन आहे. यात मनी बॅकसह मॅच्योरिटीवर एकरकमी रक्कम दिली जाते. 15 आणि 20 वर्षांसाठी ही पॉलिसी असते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 जून: जर तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम जमा करू इच्छित असाल, तर पोस्ट ऑफिसद्वारे (post office) अशी गुंतवणूक करता येऊ शकते. या स्किममध्ये दररोज 95 रुपये भरुन 14 लाख कमावता येऊ शकतात. पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या स्किम (post office scheme) घेऊन येत असतं, ज्यात ग्राहक कमी वेळेत मोठी रक्कम जमा करू शकतात. पोस्ट ऑफिस स्किम ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा (Gram Sumangal Rural Postal Life Insurance) असं या स्किमचं नाव आहे. ही पॉलिसी अशा लोकांसाठी अतिशय फायदेशीर आहे, ज्यांना काही-काही वेळाने पैशांची गरज भासते. काय आहे स्किम - Post Office चा हा एंडोमेंट प्लॅन आहे. यात मनी बॅकसह मॅच्योरिटीवर एकरकमी रक्कम दिली जाते. रुरल पोस्टल लाइफ इन्शोरन्स स्किमची सुरुवात भारत सरकारने 1995 मध्ये केली होती. याचअंतर्गत ग्राम सुमंगल स्किम येते. यात आणखी इतर पाच विमा स्किमदेखील ऑफर केल्या गेल्या आहेत. ग्राम सुमंगल स्किम 15 आणि 20 वर्षांसाठी असते. यात मॅच्योरिटीआधी तीन वेळा मनी बॅक मिळते. या योजनेत गुंतवणूक केलेल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबियांना विम्याच्या रकमेसह, बोनस रक्कमही दिली जाते.

  (वाचा - तुम्हीही बँकेत FD केली असेल तर जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी)

  कोणाला मिळतो याचा फायदा - - या स्किमचा लाभ कोणताही भारतीय व्यक्ती घेऊ शकतो. - या पॉलिसीसाठी कमीत-कमी वयोमर्यादा 19 वर्ष आहे. तर अधिकतर वयोमर्यादा 45 वर्ष आहे. - पॉलिसी 15 किंवा 20 वर्षांसाठी घेता येऊ शकते. - 20 वर्षांसाठी पॉलिसी घेतल्यास, वयोमर्यादा 40 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. - यात जास्तीत-जास्त विम्याची रक्कम 20 लाखांपर्यंत उपलब्ध आहे.

  (वाचा - अवघे 20 वर्षे 4000 ची गुंतवणूक ठरले फायदेशीर;पुढील 20 वर्षे मिळवाल महिना 25 हजार)

  कसे मिळतील 14 लाख - समजा, 25 वर्षीय व्यक्तीने 7 वर्ष सम एश्योर्डसह पॉलिसी खरेदी केल्यास, त्याला वार्षिक प्रीमियम 32,735 रुपये भरावा लागेल. सहा महिन्यांसाठी 16,715 रुपये प्रीमियम आणि तिमाही प्रीमियम 8449 रुपये भरावा लागेल. अशाप्रकारे त्या व्यक्तीला दर महिन्याला 2853 रुपये द्यावे लागतील. म्हणजे 95 रुपये दिवसाला प्रीमियम जाईल. ही पॉलिसी 20 वर्षांच्या हिशोबाने आहे. यात 8 व्या, 12 व्या, 16 व्या वर्षी 20-20 टक्क्यांच्या हिशोबाने 1.4-1.4 लाख रुपये मनी बॅक दिले जातील. या स्किममध्ये प्रति हजार, दरवर्षाला 48 रुपये बोनस मिळतो. सात लाख रुपये सम एश्योर्डचा बोनस एका वर्षात 33,600 रुपये इतका होतो. 20 वर्षांसाठी ही रक्कम 6.72 लाख रुपये होते. 20 व्या वर्षी उरलेली रक्कम 2.8 लाख रुपयेदेखील मिळतील. सर्व पैसे एकत्रितपणे जोडल्यास 20 वर्षांत 19.72 लाख रुपये मिळतात.
  Published by:Karishma Bhurke
  First published: