'राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोलेही आमच्याकडे येऊ शकतात'; आठवले यांचा दावा

Ramdas Athawale in Sangli: आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलाताना महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित अनेक दावे केले आहेत.

Ramdas Athawale in Sangli: आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलाताना महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित अनेक दावे केले आहेत.

  • Share this:
सांगली, 14 मार्च : राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलल्याने आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सचिव वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखीचं तापलं आहे. अशातचं भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (Presidential Rule) लागू करावी, अशी मागणी केली आहे. असं असताना भाजपाला पाठिंबा दर्शवणारे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये, अशी आमची अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या अनुषंगाने अनेक दावे केले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कमकुवत असल्याचं सांगताना त्यांनी म्हटलं की, 'राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोले सुद्धा आमच्या कडे येऊ शकतात. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पण टिकू शकणार नाही. कारण त्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत, असा दावाही रामदास आठवले यांनी यावेळी केला. त्याचबरोबर 'गो कोरोना गो' या प्रसिद्ध घोषणेनंतर त्यांनी आणखी एक नवीन घोषणा दिली आहे. यावेळी त्यांनी 'गो कोरोना नो कोरोना' अशी नवीन घोषणा दिली आहे. सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. तसेच कोरोना विषाणूचे रुग्णही वाढत चालले आहेत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असंही आठवले यावेळी म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी ते म्हणाले की, 'मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आमचं समर्थन आहे. मी स्वतः याबाबतची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. हे ही वाचा -माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित काँग्रेसच्या बैठकीत राडा, पाहा VIDEO या शिवाय त्यांनी राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलल्याचा पार्श्वभूमीवर आपलं मत दिलं आहे. MPSC च्या परीक्षा वेळेवर घेतल्या पाहिजेत, अशी मागणीही रामदास आठवले यांनी यावेळी केली आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ अशी आमची अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले आहेत. राज्यासह संपूर्ण देशातून कोरोना हद्दपार व्हावा, अशी आशा व्यक्त करत आठवले यांनी आता 'गो कोरोना, नो कोरोना' अशी नवीन घोषणा दिली आहे.
Published by:News18 Desk
First published: