मलायका अरोरा, करीना कपूरचं आदर पूनावालांसोबत नातं काय? PHOTO मुळे चर्चांना उधाण

मलायका अरोरा, करीना कपूरचं आदर पूनावालांसोबत नातं काय? PHOTO मुळे चर्चांना उधाण

मलायका अरोरा (Malika Arora), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि आदर पूनावाला (Adar poonawalla) यांचं कुटुंबं बऱ्याचदा एकत्र दिसतं.

  • Share this:

पुणे, 06 मे : देशातील औषध निर्माती क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून पुणे स्थित सीरम इन्स्टीट्यूट (Serum Institute) प्रसिद्ध आहे. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे (Corona Virus Pandemic) तर या कंपनीचे नाव अगदी सर्वसामान्य माणसालाही माहित झाले आहे. कोविड-19 प्रतिबंधात्मक लस (Covid-19 Vaccine) उत्पादनात या कंपनीचा मोलाचा वाटा आहे. देशातील दोनच कंपन्या सध्या लस निर्मितीत आघाडीवर आहेत, त्यापैकी एक सीरम आहे. देशालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना लस पुरवण्याचे काम सीरम करत आहे. अशा या महत्त्वाच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आदर पूनावाला (Adar Poonawalla). लस निर्मितीबाबतच्या उलटसुलट विधानांमुळे तेही चर्चेत असून ,सध्या ते लंडनमध्ये आहे. आदर पूनावाला यांच्याविषयी विविध बाबतीत चर्चा होत असताना त्यांचे बॉलिवूड कनेक्शनही चर्चेत आलं आहे.

मलायका अरोरा (Malika Arora) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) आणि आदर पूनावाला यांचं  कुटुंबं बऱ्याचदा एकत्र पार्टी करताना किंवा पिकनिक, ट्रीप एन्जॉय करताना दिसतात. त्यामुळे मलायका अरोरा आणि करीना कपूर यांचं आदर पूनावाला यांच्याशी काय नातं आहे याची चर्चा सध्या जोर पकडत आहे.

एशियानेट न्यूज डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, करीना कपूर हिच्या अगदी जवळच्या मित्रमैत्रिणीमध्ये (Close Friends) तिची बहीण करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा, करण जोहर, मल्लिका भट आणि नताशा पूनावाला यांचा समावेश आहे.

नताशा या करीना कपूरची बेस्ट फ्रेंड आहेत. नताशा पूनावाला (Natasha Poonawalla) आदर पूनावाला यांच्या पत्नी असून त्या सीरम इन्स्टीट्यूटच्या कार्यकारी अध्यक्ष आणि विलू पूनावाला फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या अध्यक्ष आहेत.

हे वाचा - ‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भररस्त्यात चोपला पाहिजे’, रितेश देशमुख संतापला

नताशा यांच्या इन्स्टाग्राम पेजला भेट दिली तर अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीजचे फोटो दिसतील. निर्माता करण जोहर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा हेदेखील त्यांचे चांगले मित्र असून, त्यांच्यासोबतही अनेक फोटो इथं पाहायला मिळतील. नताशा पूनावाला या फॅशनिस्ट असून त्यांचा फॅशन सेन्स अतिशय उत्तम आहे. त्यामुळे करीना, मलायका यांच्यासोबत त्यांचे अनेक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर पाहता येतील. नताशा या समाजसेवी उपक्रम राबवण्यातही आघाडीवर असतात. त्या भारतातील ब्रिटीश आशियाई ट्रस्टच्या चिल्ड्रन प्रोटेक्शन फंडच्या अध्यक्षदेखील आहेत. त्याद्वारे विविध कार्यक्रम त्या राबवत असतात.

First published: May 6, 2021, 9:11 PM IST

ताज्या बातम्या