बार, पब्स, रेस्टॉरंट बंद; तरी लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक खपली दारू कारण...

इंटरनॅशनल वाइन अँड स्पिरिट्स रिसर्च (International Wine & Spirits Research) या संस्थेची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे.

इंटरनॅशनल वाइन अँड स्पिरिट्स रिसर्च (International Wine & Spirits Research) या संस्थेची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 15 जून  : कोरोनाच्या संकटामुळे देशात वर्क फ्रॉम होमची (Work From Home) संस्कृती विकसित झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून बहुतांश लोकं घरूनच काम करत आहेत. ही संस्कृती केवळ कामापुरतीच मर्यादित राहिली नसून, मद्यपानापर्यंत (Liquor) पोहोचली आहे. बार (Bars and Pubs) , पब्स आणि पार्टीज बंद आहेत तरी लोकांचं घरी मद्यपान करण्याचं प्रमाण वाढलं आहे. इंटरनॅशनल वाइन अँड स्पिरिट्स रिसर्च (International Wine & Spirits Research) या संस्थेची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. इंटरनॅशनल वाइन अँड स्पिरिट्स रिसर्च (International Wine & Spirits Research) या संस्थेच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या वर्षी ऑन ट्रेड चॅनेलच्या मदतीने 11 टक्के जास्त मद्याची विक्री झाली. 2020 मध्ये ज्या काळात देशातले बार्स आणि रेस्तराँमध्ये मद्याची विक्री केवळ 10 टक्के झाली होती, त्या काळात घरपोच होणाऱ्या मद्यविक्रीत वाढ झाली होती. इकॉनॉमिक टाइम्सने याबद्दलचं वृत्त प्रकाशित केलं आहे. त्यात युनायटेड स्पिरिट्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद कृपालू यांनी सांगितलं, की 'कोरोनाच्या काळात लोकांच्या लक्षात आलं, की घरात मद्यपान करणं स्वस्त ठरू शकतं. तसंच कॅज्युअल गेट टुगेदरची संख्या कमी झाली. त्यामुळे घरात मद्य पिणाऱ्या लोकांचा खर्च मर्यादितच राहिला.' हे वाचा - डोनाल्ड ट्रम्पवर कुल्फी विकायची वेळ आली की काय? पाहा VIDEO आणि वाचा सत्य देशात होणाऱ्या एकंदर मद्यविक्रीमध्ये बार आणि रेस्तराँमध्ये (Bars & Restaurants) होणाऱ्या विक्रीचा वाटा एक तृतीयांश आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) गेल्या वर्षी बार आणि रेस्टॉरंट बंद ठेवावे लागले होते. नंतरच्या काळात त्यांना उघडण्याची परवानगी मिळाली असली, तरी ती कमी क्षमतेने सुरू होती. त्यामुळे मद्यपान करू इच्छिणाऱ्यांनी घरीच मद्यपान (Liquor at home) करण्याचा पर्याय निवडला. इंटरनॅशनल वाइन अँड स्पिरिट्स रिसर्चच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये बार आणि रेस्टॉरंटच्या माध्यमातून 27 टक्के मद्यविक्री झाली होती. 2020 मध्ये हे प्रमाण 10 टक्क्यांवरच मर्यादित राहिलं. घरात पिण्याचं प्रमाण वाढल्यामुळे किरकोळ दारूविक्री (Retail Alcohol Shops) करणाऱ्या दुकानांमधून होणाऱ्या विक्रीचं प्रमाण 88 टक्क्यांवर पोहोचलं. 2019 मध्ये हे प्रमाण 73 टक्के होतं. हे वाचा - WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, विराटने दाखवला या खेळाडूंवर विश्वास देशातल्या अनेक राज्यांत मद्याच्या घरपोच विक्रीची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मद्याची ऑनलाइन विक्री (Online Liquor) वाढण्याची शक्यता होती; मात्र डिलिव्हरी चार्ज, तसंच कमजोर फ्रेमवर्क, नियामक यंत्रणेतली अनिश्चितता, गुंतवणुकीसाठी मागे-पुढे पाहणं आदींमुळे ऑनलाइन मद्यविक्री वाढली नाही. गेल्या वर्षी ऑनलाइन चॅनेलच्या माध्यमातून 53.5 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. एकंदर बाजारपेठेच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 0.1 टक्के एवढंच आहे.
Published by:Atharva Mahankal
First published: