देवमाणूस: वाड्यात पोलिसांना सापडली पहिली बॉडी; डिम्पल अडकणार पोलिसांच्या जाळ्यात?

Dev Manus Marathi serial: डिम्पलने हलवलेली बॉडी सापडली पोलिसांना. पोलिसांना डिम्पलवर येणार संशय?

Dev Manus Marathi serial: डिम्पलने हलवलेली बॉडी सापडली पोलिसांना. पोलिसांना डिम्पलवर येणार संशय?

 • Share this:
  मुंबई 15 जून : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील सतत चर्चेत राहणारी मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) वेगळ्या वळणार पोहोचली आहे. मुख्य गुन्हेगार देवी सिंग (Devi Singh) अर्थात गावकऱ्यांचा डॉक्टर पोलिसांच्या तावडीत आहे. पण अद्यापही त्याची कारस्थानं थांबण्याचं नाव घेत नाहीत. कोर्टात तो उलटसुलट उत्तर देऊन कोर्टाची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करत आहे. तर आता त्याने वाड्यात लपवलेल्या बॉडी तेथून हलवण्याचाही प्रयत्न केला आहे. डॉक्टर जेलमध्ये असला तरीही त्याने कोणताच गुन्हा कबूल केलेला नाही. तर आपण काहीच केलेलं नाही असं तो सांगत आहे. तर आता त्याने डिम्पलला वाड्यातील कट्ट्यात असलेली रुपाची बॉडी तेथून हलवायला सांगितली होती.
  मात्र वाडा सील असल्याने कोणालाही तेथे जाण्यास परवाणगी नाही तरीही डिम्पल डॉक्टरच्या सांगण्यावरून ती बॉडी हलवण्याचा प्रयत्न करते पण वाड्यातून खोदण्याचा आवाज येताच पोलिस पोहोचतात आणि डिम्पलला मात्र बॉडी म्हणजेच हाडांचा सांगाडा हलवता येत नाही. पण त्या कट्ट्यात बॉडी असल्याचं पोलिसांना मात्र समजलं आहे.
  त्यामुळे आता अशाप्रकारे पोलिसांनी पहिल्या बॉडीचा शोध लावला असून आणखीही काही मिळतं का याची कसून चौकशी करत आहेत. तसेच बॉडी आता पोस्टमॉर्टमला गेल्याने ती कोणाची आहे याचाही शोध लागणार आहे. पण ही बॉडी नक्की कोणी हलवण्याचा प्रयत्न केला याचा पोलिस शोध घेत आहेत. आणि यामुळे डिम्पल मात्र पूरती घाबरली आहे. तर वाड्यातील सगळे सदस्यही यामुळे घाबरले आहेत.

  तलावात झोपून Photoshoot ; पाहा मराठमोळ्या पूजा सावंतचा बोल्ड अवतार

  दिव्याने आता वाड्यातील सगळ्यांचीच चौकशी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मालिकेत नक्की काय वळण येणार हे पाहणं ओत्युक्याचं ठरेल. तसेच डिम्पलवर पोलिसांचा संशय बळावणार का हे ही पाहणं महत्त्वाचं ठरेल.
  Published by:News Digital
  First published: