सिद्धार्थ जाधवनं राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेअर केला दुर्मिळ फोटो

‘मराठी कलाकार यांच्या विषयीचं त्यांचं प्रेम...’; सिद्धार्थ जाधवनं सांगितली राज ठाकरेंसोबतची आठवण

‘मराठी कलाकार यांच्या विषयीचं त्यांचं प्रेम...’; सिद्धार्थ जाधवनं सांगितली राज ठाकरेंसोबतची आठवण

  • Share this:
    मुंबई 14 जून: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. (Raj Thackeray Birthday) त्यांचं नुसतं भाषण ऐकण्यासाठी देखील लाखोंची गर्दी उसळते. अशा या करिश्माई नेत्याचा आज वाढदिवस आहे. 53 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddhartha Jadhav) याने देखील राज ठाकरेंसोबतची एक आठवण सांगून त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. “मा.राजसाहेब ठाकरे यांची प्रत्येक कार्याकडे बघण्याची कलात्मक दृष्टी, संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणूस,मराठी कलाकार यांच्याविषयीचं त्यांचं प्रेम.. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, उत्तम वक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” असं ट्विट सिद्धार्थनं केलं. सोबतच राज ठाकरेंसोबतचा एक दुर्मिळ फोटो देखील त्यानं शेअर केला. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘तुझ्याशिवाय आयुष्य...’; सुशांतच्या आठवणीनं रिया चक्रवर्ती झाली व्याकूळ भाग्यश्री मोटेनं सांगितलं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित; चाहत्यांना बसला धक्का यापूर्वी मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यानं देखील एक खास पत्र लिहून राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. “राजसाहेब..... ते राजकीय नेते म्हणून कसे आहेत? याविषयी लिहायला त्यातला मी माहीर नाही. पण एक कलावंत आणि मित्र म्हणून एका वाक्यात लिहू शकतो... तो राजा माणूस आहे.. तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणं फार अवघड आहे... संगीत चित्रपट या दोन क्षेत्रातला  त्यांच्या तोडीचा माहितगार दुसरा कोणी मी पाहिला नाही.. मैत्री करावी तर या राजा माणसाशी.. सतत लक्ष असतं त्यांचं.. सतत संपर्कात असतात.. वाढदिवस साजरा करून वय वाढत, पण राजसाहेब यंग ॲन्ड डायनॅमिक आहेत... या कोरोनाच्या कठिण परीस्थिती मधे हा एकमेव राजकीय नेता होता, ज्याने कितीही विरोधात असला तरी त्याची राजकीय पोळी भाजली नाही.. हे आपल्याला सतत जाणवलय..मान्य करायालाच हवं... वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना रिताशाचं प्रत्युत्तर; Bikini फोटो शेअर करत उडवली खळबळ एकच वाटतं की, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात अजून तशी संधी मिळाली नाही.. त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे. एकदम 70mm.. आपण इतक्या लोकांना संधी दिली.. काहींना  न देता गोळाबेरीज करून त्यांनी आपली आपणच मिळवली... एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ.. नक्कीच आपल्यावर "राज्य" येणार नाही, याची ते काळजी घेतील..आज त्यांचा वाढदिवस आहे.. त्यानिमित्ताने हे गीफ्ट येत्या निवडणुकीत मनसे मतदान करून देऊ.. मला खात्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांना मनोमन मानणारे राजसाहेब आपल्या अपेक्षा नक्कीच पुर्ण करतील…”
    Published by:Mandar Gurav
    First published: