'आज रात्री मला शांत झोप लागेल', कोरोनातून बरं झाल्यानंतर प्रिया बापटने पहिल्यांदाच केलं मोठं काम

'आज रात्री मला शांत झोप लागेल', कोरोनातून बरं झाल्यानंतर प्रिया बापटने पहिल्यांदाच केलं मोठं काम

कोरोनातून बऱ्या झालेल्या प्रिया बापटने (Priya Bapat) आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 मे : कित्येक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही सेलिब्रिटी बरेही झाले आहेत. कोरोनाशी सामना करत असताना या सेलिब्रिटींनी आपला अनुभवही मांडला तर अनेकांनी कोरोनातून बरं झाल्यानंतर समाजासाठी त्यांच्या परीने जे काही करता येईल ते केलं आहे. अशाच सेलिब्रिटींमध्ये आता मराठी अभिनेत्री (Marathi actress) प्रिया बापटचाही (Priya Bapat) समावेश झाला आहे. प्रिया बापटने कोरोनातून बरं झाल्यानंतर मोठं काम केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या आयुष्यात तिने पहिल्यांदाच हे काम केलं आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या प्रिया बापटने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. कारण तिला आयुष्यात जे आजवर जमलं नाही ते तिने कोरोनातून बरं झाल्यानंतर केलं आहे. त्यामुळे आता आपल्याला शांत झोप लागणार असल्याचं तिने म्हटलं आहे. प्रियाने याबाबत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया म्हणाली, कोरोनातून बरं झाल्यानंतर अखेर आपल्याला रक्तदान (Priya bapat blood donation) करता आलं. समाजाला काहीतरी देण्याची ही संधी मला सोडायची नव्हती.

हे वाचा - आई झाल्यानंतर समीरा होती नैराश्येत; कशी केली मानसिक समस्येवर मात

प्रियाने सांगितलं, "हे माझं पहिलं रक्तदान आहे. हो. मला माहिती आहे, हे मी खरंतर पहिलंच करायला हवं होतं. पण मला खरं तर सुईची फार भीती वाटते. त्यामुळे मी कधी इंजेक्शन घेण्याचंही धाडस केलं नाही. अशी मी दुर्मिळच असेन. माझा रक्तगटही तेच सांगतं. माझा रक्तगट ए निगेटिव्ह आहे. त्यामुळे एखाद्या दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीने रक्तदान करणं हे महत्त्वाचं आहे.  माझे डॉक्टर सांगायचे, रक्त ही एकच गोष्ट आहे जी व्यक्ती जिवंत असताना दान करू शकते आणि तू ते करायला हवं"

"मी जर आता माझ्या भीतीवर मात केली नसती तर मला खूप पश्चाताप झाला असता, माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असंच वाटलं असतं. त्यामुळे कोरोनातून बरं झाल्यानंतर मी माझ्या भीतीवर मात करण्याचा निर्णय घेतला आणि किमान एक जीव वाचवण्यासाठी मी जे काही करू शकते ते केलं", असं ती म्हणाली.

हे वाचा - 'लस घ्यायला चुकून सुद्धा इथे जाऊ नका'; 'देवमाणसा'ने दिलाय इशारा

"या महासाथीत आपणा सर्वांनाच असहाय्य वाटतं आहे. पण फक्त रक्तदान करून मला काही बळ मिळालं आहे. मी जे करू शकत होते ते केलं. आज मी कोणत्याही अँझायटीशिवाय शांत झोपेन. आज मी झोपेन, या भुयाराच्या पलीकडे एक प्रकाश आपल्याला नक्कीच प्रकाश दिसेल अशी आशा मला आहे", असा विश्वासही प्रियाने व्यक्त केला आहे.

Published by: Priya Lad
First published: May 10, 2021, 11:04 PM IST

ताज्या बातम्या