ही अभिनेत्री होणार तिसऱ्या बाळाची आई; प्रेग्नन्सीच्या नवव्या महिन्यातच नवऱ्याची चौथ्या मुलासाठी तयारी

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) लवकरच आई होणार असून ती तिसऱ्या बाळाला जन्म (Baby Birth) देणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) लवकरच आई होणार असून ती तिसऱ्या बाळाला जन्म (Baby Birth) देणार आहे.

  • Share this:
मुंबई, 12 जून: बॉलिवूड अभिनेत्रींच्या (Bollywood Actress) खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. अनेक अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात. त्यातही एखाद्या अभिनेत्रीचं आई होणं हा तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय असतो. अभिनेत्री लिसा हेडन ही देखील याच कारणानं सध्या चर्चेत आहे.
View this post on Instagram

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) लवकरच आई होणार असून ती तिसऱ्या बाळाला जन्म (Baby Birth) देणार आहे. लिसाने आपल्या अदाकारीने यापूर्वीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि सध्या ती आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. आपल्याला 4 मुलं असावीत असं मला माझ्या पतीनं यापूर्वीच सांगितल्याचं लिसाने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
View this post on Instagram

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

तिसऱ्या बाळाच्या आगमनाची केली होती घोषणा- लिसा ऑक्टोबर 2016 मध्ये डिनो ललवाणी यांच्यासोबत विवाहबध्द झाली होती. लिसा आणि डिनोला जॅक (Jack) आणि लिओ (Leo) नावाची दोन मुलं आहेत. आता हे दांपत्य तिसऱ्या अपत्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. लिसा आता तिसऱ्यांदा आई होणार आहे. ही आनंदाची बातमी तिने 8 फेब्रुवारी 2021 रोजी एक व्हिडीओव्दारे शेअर केली होती. हा व्हिडीओ शेअर करताना लिसाने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, की येत्या जूनमध्ये तिसऱ्या बाळाचे आगमन होत आहे. (हे वाचा:भाभीजी... फेम मनमोहन तिवारीची मुलगी अभिनेत्रींनाही देते टक्कर; पाहा PHOTO  ) चौथ्या बाळाची आहे अपेक्षा- हार्पर बाजारशी बोलताना लिसाने चौथ्या बाळाविषयी अपेक्षा व्यक्त केली होती. यावेळी लिसा हेडन म्हणाली की माझे पती डिनो आणि मला चार अपत्यांची अपेक्षा आहे. परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत देवाची इच्छा नाही तोपर्यंत आम्हाला तीनवरच थांबावं लागेल. (हे वाचा:DDLJ साठी शाहरुख नव्हे, तर 'हा' 'हॉलिवूड अभिनेता होता दिग्दर्शकाची पहिली पसंत  ) लिसाची पोस्ट- लिसा हेडन जेव्हापासून प्रेग्नंट आहे, तेव्हापासूनचा काळ ती मनापासून एन्जॉय करत आहे. ती सोशल मीडियावर सातत्याने आपला बेबी बंप (Baby Bump) फ्लॉंट करताना दिसत आहे. लिसाने 11 एप्रिल 2021मध्ये आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Account) एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती तिच्या जॅक या मुलाला मांडीवर घेऊन बसलेली दिसते.  हा फोटो शेअर करताना लिसा लिहिते, ‘एखादी आई एका बाळाला आपल्या मांडीवर घेते, तेव्हा दुसऱ्या बाळाच्या येण्याने घाबरुन जाते? अशा वेळी मला त्याच्या छोट्या–छोट्या भावनांची काळजी वाटते. तो आताच कुठे बोलायला लागला आहे, अशा स्थितीत त्याला स्वतःविषयी कसं जाणवत असेल, तो कसा व्यक्त होईल. तू अनमोल आहेस, आणि 10 दिवसांनी जेव्हा तुझ्या बहिणीचे आगमन होईल तेव्हाही तू असाच असशील.’
Published by:Aiman Desai
First published: