90% प्रभावी, व्हेरिएंट्सवरही भारी; आता कोरोना लढ्यात पुण्याच्या सीरमची Novavax

अमेरिकेलीत नोवोवॅक्स (Novavax) कंपनी आणि सीरम इन्स्टिट्यूने तयार केलेल्या SII Novavax या कोरोना लशीच्या चाचणीचे परिणाम खूपच सकारात्मक आले आहेत.

अमेरिकेलीत नोवोवॅक्स (Novavax) कंपनी आणि सीरम इन्स्टिट्यूने तयार केलेल्या SII Novavax या कोरोना लशीच्या चाचणीचे परिणाम खूपच सकारात्मक आले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 14 जून : भारतात सध्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची (Pune serum institute of india) कोविशिल्ड लस दिली जाते आहे. सीरमने तयार केलेली आणखी एक लस लवकरच भारतात दिली जाणार आहे. अमेरिकेलीत नोवोवॅक्स (Novavax) कंपनीच्या मदतीने सीरम इन्स्टिट्यूने तयार  केलेल्या SII novavax या लशीच्या चाचणीचे परिणाम खूपच सकारात्मक आले आहे. SII novavax म्हणजेच NVX-CoV2373 कोरोना लस. 29,960 लोकांवर या लशीचं ट्रायल घेण्यात आलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचे परिणाम जारी करण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या लशीचा एकूण प्रभाव 90.4 टक्के आहे. तर मध्यम आणि तीव्र आजारापासून संरक्षण देण्यात ही लस 100 टक्के प्रभावी आहे. हे वाचा - घाबरू नका! बिनधास्त घ्या Corona vaccine; सुरक्षिततेबाबत हा घ्या पुरावा नोवाव्हॅक्सने सांगितलं, यूएस आणि मेक्सिकोमध्ये या लशीची चाचणी घेण्यात आली. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सपासून ही लस सुरक्षात देते. सर्वात जास्त प्रभावी आहे. प्राथमिक अहवालानुसार ही लस सुरक्षित आहे आणि जवळपास 90% प्रभावी आहे. या लशीचा साठा आणि वाहतूकही सोपी आहे. जगभरात ही लस खूप फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत यूएस, युरोप आणि जगभरातील इतर देशांकडून कंपनी आपल्या लशीसाठी परवानगी मागणार आहे. त्यानंतर महिन्याला या लशीचे 100 दशलक्ष डोस उत्पादिक केले जाणार आहे. हे वाचा - मोदी सरकार 12 वर्षांवरील मुलांनाही लस देण्याच्या तयारीत; भारत बायोटेकशी चर्चा आपल्या लशीचे बहुतेक डोस मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जातील, असं नोवोवॅक्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह स्टॅनले इरेक यांनी असोसिएट प्रेसशी बोलताना सांगितलं. दरम्यान भारत या वर्षाच्या अखेरपर्यंत या लशीचे 20 कोटी डोस आणण्याच्या तयारीत आहे.
    Published by:Priya Lad
    First published: