देशातील शास्त्रज्ञानं बनवलं 250 ग्रॅम वजनाचं पॉकेट व्हेंटिलेटर, कोरोनाविरोधातील लढ्यात ठरणार महत्त्वपूर्ण

कोलकाताच्या एका शास्त्रज्ञानं पॉकेट व्हेंटिलेटरची (Pocket Ventilator) निर्मिती केली आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी एक इंजिनिअर असून ते सतत वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावत असतात.

कोलकाताच्या एका शास्त्रज्ञानं पॉकेट व्हेंटिलेटरची (Pocket Ventilator) निर्मिती केली आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी एक इंजिनिअर असून ते सतत वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावत असतात.

  • Share this:
    नवी दिल्ली 11 जून : कोरोना काळात देशात (Coronavirus in India) आरोग्य सुविधांचा मोठा अभाव जाणवत आहे. अशात देशात व्हेंटिलेटरचं संकटही वाढलं असून यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक प्रयत्न करावे लागत आहेत. अशात कोलकाताच्या एका शास्त्रज्ञानं या समस्येवर एक पर्याय शोधला आहे. त्यांनी पॉकेट व्हेंटिलेटरची (Pocket Ventilator) निर्मिती केली आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी एक इंजिनिअर असून ते सतत वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावत असतात. आता त्यांनी बॅटरीवर चालणारा एक पॉकेट व्हेंटिलेटर तयार केला आहे. यामुळे रुग्णाला तात्काळ उपचार मिळू शकतो. हे व्हेंटिलेटर वापरण्यास अतिशय सोपं आणि स्वस्त आहे. एखाद्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्या रुग्णासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. डॉ. मुखर्जी यांचं असं म्हणणं आहे, की कोरोना संकटाच्या काळात त्यांची ऑक्सिजन लेवल 88 वर गेली होती. तेव्हा त्यांचं कुटुंबीय त्यांना रुग्णालयात घेऊन जात होते. मी या संकटातून बाहेर आलो. मात्र, यानंतर त्यांच्या डोक्यात रुग्णांची मदत करण्याासाठी एक आयडिया आली. बरं होताच त्यांनी यावर काम करणं सुरू केलं आणि 20 दिवसात ते तयार केलं. कोरोना लस न घेतल्यास तुमचं सिम कार्ड होणार ब्लॉक, सरकारचा अजब फतवा मिळालेल्या माहितीनुसार, या डिवाइसमध्ये दोन यूनिट आहेत, पावर आणि व्हेंटिलेटर. हे दोन्ही मास्कला जोडलेले आहेत. एक बटण दाबताच व्हेंटिलेटर काम करणं सुरू करतं आणि स्वच्छ हवा रुग्णापर्यंत पोहोचवतं. मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या रुग्णाला कोरोना असल्यास यूवी फिल्टर व्हायरस मारण्यास मदत करतो आणि साफ हवा रुग्णापर्यंत पोहोचवतो. पुणेकरांना दिलासा! सोमवारपासून काय- काय सुरु होणार, वाचा सविस्तर या व्हेंटिलेटरच्या मदतीनं व्हायरसचा प्रसार कमी होईल. रुग्ण आणि डॉक्टरांना दिलासा मिळेल. मुखर्जी यांनी असाही दावा केला आहे, की ब्लॅक फंगसची प्रकरणं वाढत असताना हे व्हेंटिलेटर रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. विशेष बाब म्हणजे या पॉकेट व्हेंटिलेटरमध्ये एका कंट्रोल नॉबही आहे. याच्या मदतीनं हवेचा फ्लो कंट्रोल करता येऊ शकतो. याचं वजन केवळ 250 ग्रॅम असून हे बॅटरीवर चालतं. एकदा चार्ज केल्यानंतर हे आठ तासांपर्यंत काम करू शकतं. अॅन्ड्रॉइड फोनच्या चार्जनंही हे चार्ज केलं जाऊ शकतं. कोरोना संकटाच्या काळात व्हेंटिलेटरची समस्या असताना हा पर्याय खरंच उपयुक्त ठरल्यास कोरोनाविरोधातील लढ्यात याचा मोठा उपयोग होऊ शकतो.
    Published by:Kiran Pharate
    First published: