हुश्श! 'वाईट काळ संपला'; कोरोनाबाबत केंद्र सरकारने दिली पॉझिटिव्ह न्यूज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत समजल्या जाणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटबाबत महत्त्वाची बातमी.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत समजल्या जाणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटबाबत महत्त्वाची बातमी.

  • Share this:
    शिरीन भान/ 11 जून, नवी दिल्ली : कोरोनाचा लाट, कोरोनाचा प्रकोप, कोरोनाचा उद्रेक... गेले वर्षभर कोरोनासंबंधी हे शब्द कानावर पडत आहेत. कोरोनाबाबत पॉझिटिव्ह बातमी कधी मिळणार, या निगेटिव्ह शब्दांऐवजी पॉझिटिव्ह शब्द कधी ऐकायला मिळणार, असंच प्रत्येकाला वाटतं आहे. दरम्यान अखेर तो दिवस आलाच. भारतातील एका तज्ज्ञाने कोरोनाबाबत पॉझिटिव्ह न्यूज दिलेली आहे. कोरोनाचा B.1.617.2 व्हेरिएंट जो डेल्टा व्हेरिएंट म्हणूनही ओळखला जातो, तो भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला  कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही कोरोनाचा हाच व्हेरिएंट सर्वात जास्त धोकादायक असल्याचं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. दरम्यान आता भारतात डेल्टा व्हेरिएंटचा प्रकोप कमी झाला आहे, अशी दिलासादायक माहिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी न्यूज 18 शी बोलताना दिली आहे. डॉ. एन. के अरोरा यांनी सांगितलं, भारतात डेल्टा व्हेरिएंटच्या प्रकोपाबाबत सांगायचं याचा प्रकोप आता कमी झाला आहे. वाईट काळ निघून गेला आहे. हे वाचा - 21 दिवस 2100 बळी; आता भयंकर ठरतोय हा आजार, कोरोनामुक्त रुग्णांना सर्वाधिक धोका भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळलेल्या B.1.617.2 व्हेरियंटला डेल्टा (Delta) व्हेरियंट म्हटलं गेलं आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच भारतात आढळलेल्या कोरोना स्ट्रेनला भारतीय म्हणण्यावरून वाद झाला होता. केंद्र सरकारनं त्या बातम्यांवर आक्षेप घेतला होता. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या B.1.617 व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट नाव दिल्याचं म्हटलं गेलं होतं. सरकारनं म्हटलं होतं, की WHO नं कधीही भारतीय असा उल्लेख केलेला नाही.  भारतीय व्हेरियंट या शब्दावर सरकारनं आक्षेप घेतल्यानंतर WHO नंही यावर प्रतिक्रिया दिली होती. WHO नं ट्विटरवर म्हटलं होतं, की जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही व्हेरियंटला देशाच्या नावावरुन नाव देत नाही. संघटना व्हायरसच्या स्वरुपाला त्याच्या शास्त्रीय नावानेच संबोधित करते आणि इतरांनीही असंच करावं, अशी आशा आहे. पण शास्त्रीय नाव लक्षात ठेवणं सर्वसामान्यांना शक्य नसल्याने WHO नं ग्रीक अल्फाबेटच्या आधारावर कोरोना व्हेरिएंटचं नामकरण केलं. हे वाचा - केवळ पाव टक्का अधिकच्या रुग्णसंख्येने पिंपरी चिंचवडकरांचा मार्ग रोखला डेल्टा व्हेरिएंट 60 देशांमध्ये पसरला आहे. या व्हेरिएंटच्या प्रकोपामुळेच ब्रिटनमध्ये अनलॉकबाबत पुन्हा विचार करावा लागला. जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, भारतात विषाणूची दुसरी लाटे पसरण्यापाठीमागे डेल्टा वेरियंटची महत्त्वाची भूमिका होती. डेल्टा वेरियंट अल्फापेक्षा 50 टक्के ज्यास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे विषाणू संक्रमण वेगाने होते.
    Published by:Priya Lad
    First published: