राज्य सरकारनेही घेतला निर्णय; अखेर Maharashtra Board ची 12 वीची परीक्षा रद्दच!

कोरोना प्रादुर्भाव कमी न झाल्याने आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना प्रादुर्भाव कमी न झाल्याने आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:
    मुंबई, 14 जून : एप्रिल मे मध्ये घेण्यात येणारी 12 वीची (Maharashtra State Secondary & Higher Secondary Education Board) परीक्षा कोरोनाच्या महासाथीमुळे पुढं ढकलून जून महिन्यात घेण्यात येणार होती. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी न झाल्याने आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंदर्भातील परिपत्रकर काढलं आहे. अद्यापही राज्यातून कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. अशावेळी एका जरी विद्यार्थ्याच्या घरात कोरोचा रुग्ण असेल तर तो अधिक पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द (CBSE Board 12th Exam cancelled) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय सीआयएससीई बोर्डाच्या (CISCE) बारावीच्या परीक्षाही रद्द (ISC 12th Exam cancelled) करण्यात आल्या आहेत. हे ही वाचा-SSC Result: 10वी परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपद्धतीचे वेळापत्रक जाहीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय केली होती मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्याला संबोधित करत एक शैक्षणिक धोरणाची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की, शिक्षण हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. आपण दहावीच्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेतला आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षा न घेता मुल्यांकन करुन दहावीच्या विद्यार्थ्यांना पास करणार आहोत. दहावीचा निर्णय तर घेतला बारावीच्या संदर्भातही निर्णय घेणार आहोत. बारावीच्या बाबतीत आढावा घेत आहोत त्याबाबत काय पद्धत ठरवता येईल ते ठरवून लवकरात लवकर हा सुद्धा निर्णय घेऊ. मला अशी एक गोष्ट वाटते की, जशी बारावीच्या परीक्षेवर पुढचं शिक्षण अवलंबून असतं. नीट परीक्षा असेल, इंजिनिअरिंगची असेल किंवा इतर राज्यात जाऊन शिक्षण घेण्याची वेळ येते. तर त्यासाठी केंद्र सरकारने धोरण ठरवायला हवं, ही परिस्थिती संपूर्ण देश नाही तर जग ग्रासून टाकणारी आहे. शंभर वर्षांपूर्वी अशी परिस्थिती आली होती आणि त्यानंतर अशा परिस्थितीला आपण तोंड देत आहोत.
    Published by:Meenal Gangurde
    First published: