रतन टाटांनी सांगितला Success Mantra: जीवनात यशस्वी व्हायचयं; ही 6 सूत्रं लक्षात ठेवा

कोणतंही नवं काम किंवा कंपनी सुरू करण्यापूर्वी कोणत्या बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजेत? स्वतः अनेक StartUps मध्ये गुंतवणूक करणाऱ्या दिग्गज उद्योगपती रतन टाटांनी सांगितली 6 सूत्रं

कोणतंही नवं काम किंवा कंपनी सुरू करण्यापूर्वी कोणत्या बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजेत? स्वतः अनेक StartUps मध्ये गुंतवणूक करणाऱ्या दिग्गज उद्योगपती रतन टाटांनी सांगितली 6 सूत्रं

  • Share this:
नवी दिल्ली, 11 जून: आजकाल प्रत्येकाला पैसा कमवायचाय, यशस्वी व्हायचं आहे. परंतु, हे सर्व मिळवण्यासाठी फार कमी लोक त्या वाटेवर चालतात. जर तुम्ही आपला व्यवसाय सुरु करत असाल किंवा आधीपासून व्यवसायात असाल, परंतु प्रगतीचा मार्ग शोधत असाल तर उद्योगपती रतन टाटा यांचा शब्द तुमच्यासाठी मोलाचे आणि मार्गदर्शक ठरतील. दिग्गज उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी देशातील अनेक यशस्वी स्टार्टअप्समध्ये (Startups) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. असे असतानाही ते स्वतःला अक्सिडेंटल इन्व्हेस्टर (Accidental Investor) मानतात. परंतु, त्यांनी ज्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक (Startup investment) केली त्यापैकी बहुतांश कंपन्या यशस्वी झाल्या असून त्यांचा व्यवसाय अब्जावधींमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून जाणून घेऊया की कोणतीही कंपनी सुरू करण्यापूर्वी कोणत्या बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजेत... 1 इनोव्हेशनवर भर असावा रतन टाटा यांचा असा विश्वास आहे की जे नवे प्रयोग करतात, त्या स्टार्टअपचं भविष्य उज्वल असतं. त्यामुळे इनोव्हेशन (Innovation) करीत राहिलं पाहिजे. टाटा स्वतः स्टार्टअपसाठी इनोव्हेशन जास्त भर देतात. 2 मूल्यांवर फोकस हवा टाटा ग्रुपविषयी बोलायचं झालं तर या ग्रुपची व्हॅल्यू (Value) म्हणजेच मूल्य खूप जास्त आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत रतन टाटा आशा करतात की स्टार्टअप्सनेही व्हॅल्यू फॅक्टरला (Value Factor) महत्व दिले पाहिजे. रात्रीतून फरारसारख्या घटनांच्या ते तीव्र विरोधात आहेत. 3 प्रमोटर्सचा दृष्टीकोन सकारात्मक असावा रतन टाटा यांच्या म्हणण्यानुसार, स्टार्टअपच्या प्रमोटर्सचा दृष्टीकोन (Attitude) कसा आहे, ते कोणत्या आयडिया घेऊन आले आहेत आणि त्याचे निराकरण करण्यासाठी ते कोणत्या विचारांच्या आधारे कार्य करतात, हे महत्वाचे आहे. IAS होण्यासाठी सोडलं डॉक्टरचं करिअर; जिद्दी अर्तिका शुल्काची कहाणी टाटाच्या म्हणण्यानुसार, त्यांना नव्या कंपनीत गुंतवणूक करायला आवडते. त्यातही विशेष करुन नवी संकल्पना असलेल्या स्टार्टअपला ते विशेष प्राधान्य देतात. 4 कोणतीच वेळ योग्य नाही ऑक्टोबर 2019मध्ये एका मुलाखतीत रतन टाटा यांनी सांगितलं होतं की स्टार्टअपसाठी ग्लोबल (Global) होण्याकरिता योग्य वेळ वैगरे असं काही नसतं. कचरा वेचणाऱ्यांसह काम करुन कचऱ्यापासून बनवल्या हँडबॅग;आज आहे 100 कोटींचा टर्नओवर जागतिक विस्तार कधी करायचा याची जबाबदारी आणि समजूतदार हा त्या संस्थापकाचा असतो. मी हे देखील पाहतो की प्रमोटर किती मॅच्युअर आहेत आणि नव्या कंपनीबाबत ते किती गंभीर आहेत, असे टाटा यांनी सांगितले. 5 कामाला प्राधान्य द्या उद्योगासोबतच राजकारणात रस घ्यायला सुरुवात केल्याचे भारतातील अनेक औद्योगिक घराण्यांबाबत पाहायला मिळते. परंतु, टाटा ग्रुप आणि विशेष करुन रतन टाटा या सर्वापासून दूर राहिले आहेत. ते आपल्या जीवनात काम हेच सर्वकाही आहे असे मानतात आणि कामाला प्राधान्य देतात. 6 दुसऱ्यांचा सन्मान करा ज्यांना रतन टाटा वैयक्तिकरित्या माहिती आहेत ते सांगतात की रतन टाटा नेहमी शांत आणि सौम्य असतात. ते कंपनीतील छोट्यात छोट्या कर्मचाऱ्यांची प्रेमाने भेट घेतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात.
First published: