NTPC Recruitment 2021: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 280 जागांवर भरती, ही आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख

सध्याच्या काळात नोकरीच्या संधीसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या इंजिनीअरिंग क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात उत्तम सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी आहे.

सध्याच्या काळात नोकरीच्या संधीसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या इंजिनीअरिंग क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात उत्तम सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 08 जून: सध्याच्या काळात नोकरीच्या संधीसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या इंजिनीअरिंग क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात उत्तम सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी आहे. देशातील एका नामांकित सरकारी कंपनी असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात एनटीपीसीमध्ये (NTPC) एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर प्रशिक्षणार्थी (Executive Engineer Trainee) पदासाठी 280 जागांवर भरती करण्यात येत आहे. अतिशय उत्तम पगाराची ही नोकरी आहे. या पद भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी शक्य तितक्या लवकर अधिकृत वेबसाइटवर ntpccareers.net वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. एनटीपीसीनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून आहे. त्यामुळं इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज काळजीपूर्वक भरावा, त्यात काही त्रुटी आढळल्यास, अर्ज नाकारला जाईल, असं या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे. हे वाचा-नोकरदारांसाठी मोठी बातमी! लवकरच वाढणार तुमचा PF, वाचा काय आहे सरकारचा प्लॅन पात्रता या पदासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रात इंजिनीअरिंगची किंवा बीटेक पदवी घेतलेल्या आणि गेट परीक्षा (GATE Exam) उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल. गेट परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यामुळे या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे या परीक्षेचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. पात्रतेबाबतच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत सूचना पाहता येईल. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय (AGE) 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 27 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या वर्गांना नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी ntpccareers.net वर उपलब्ध असलेली अधिसूचना तपासा. हे वाचा-PNB आणि BOI च्या ग्राहकांनी लक्ष द्या! या 2 बँकांना RBI ने ठोठावला 6 कोटींचा दंड अर्ज कसा करावा? या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटच्या होम पेजवर रिक्रूटमेंट सेक्शनमध्ये जा आणि संबंधित पोस्टवर क्लिक करून नोंदणी करा. नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेच्या सहाय्याने अर्ज भरू शकता. अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रिंट आउट घ्या. एका नामांकित सरकारी कंपनीत नोकरीची ही सुवर्णसंधी हातची घालवायची नसेल तर, घाई करणं आवश्यक आहे. कारण आता या पदासाठी अर्ज करण्याकरता दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळं पात्र उमेदवारांनी तातडीनं संबधित वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज भरणं आवश्यक आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published: