
- News18 Lokmat
- Last Updated:
नागपुर, 5 मार्च : महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेजवळील (Maharashtra-Chhattisgarh border) गडचिरोली पोलिसांच्या (Gadchiroli Police) सी-60 कमांडोच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अभियानात शुक्रवारी नक्षलवाद्यांच्या शस्त्रांस तयार करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड करण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचं शस्त्र निर्मितीचं युनिट (कारखाना) उद्ध्वस्त केलं आहे. गडचिरोली रेंजचे पोलीस उपमहानिर्देशक संदीप पाटील यावर म्हणाले की, छत्तीसगड सीमेजवळील तब्बल 5 किलोमीटर आत माड भागात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या संघर्षात एक जवान जखमी झाला आहे.(Great success for C 60 commandos of Gadchiroli police Naxal weapons manufacturing unit destroyed )
ते पुढे म्हणाले की, पोलीस दलाच्या मदतीसाठी एक हेलिकॉप्टर रवाना करण्यात आलं आहे. येथील माओवाद्यांच्या शस्त्रास्त्र तयार करणाऱ्या युनिटचा भांडाफोड झाला आहे.
हे ही वाचा-नागपूरमध्ये भाजपच्या गोटात खळबळ, नेत्यावर विनयभंग आणि अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल
48 तासांपासून अभियान सुरू
डीआयजींनी सांगितलं की, गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यातील कोपारशीच्या जंगलात गेल्या 48 तासांपासून अभियान जारी आहे. टीम शिबिरात आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल, असं सांगितलं जात आहे. (Great success for C 60 commandos of Gadchiroli police Naxal weapons manufacturing unit destroyed )