Whatsapp वरूनच करा मोबाईल रिचार्ज, कोरोना लशीचीही माहिती मिळवा; कसं ते पाहा

Whatsapp वरूनच करा मोबाईल रिचार्ज, कोरोना लशीचीही माहिती मिळवा; कसं ते पाहा

रिलायन्स जिओने (Reliance Jio) ही सुविधा व्हॉटसअप चॅटबॉटच्या (Chatbot) माध्यमातून सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई,10 जून :  कोरोना काळात रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. यानुसार जिओ युझर्स आता व्हॉट्सअॅपच्या (Whatsapp) मदतीने आपला मोबाईल क्रमांक रिचार्ज (Mobile recharge through Whatsapp) करू शकणार आहेत. तसंच युझर्सला आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर कोविड लस (Covid Vaccine) उपलब्ध आहे किंवा नाही याबाबतची माहिती मिळणार आहे.

जिओने ही सुविधा व्हॉटसअप चॅटबॉटच्या (Chatbot) माध्यमातून सुरू केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता जिओ युझर्स व्हॉटसअपच्या मदतीने बिल भरणा, समस्यांचे निराकरण आणि तक्रार नोंदवण्यासह चॅटबॉटवर अन्य सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहे.

या नव्या सुविधेसाठी या क्रमांकावर Hi असं पाठवावं लागेल

जिओने आपल्या ग्राहकांसाठी व्हॉटसअॅपच्या मदतीने सेवा पुरवण्यासाठी एक नवी सुविधा (Service) सुरू केली आहे. ही सुविधा 7000770007 या क्रमांकावर उपलब्ध होईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युझरला या क्रमांकावर केवळ Hi असा मेसेज पाठवावा लागणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून युझर आपल्या परिसरात कोविड लस उपलब्ध आहे का नाही याबाबत माहिती मिळवू शकणार आहे.

हे वाचा - या मेसेजद्वारे Airtel, Jio Vodafone ग्राहकांची होतेय फसवणूक, असं राहा सुरक्षित

कोविड-19 लशीच्या उपलब्धतेची माहिती युझर्स विना वनटाईम पासवर्ड चॅटबॉटच्या माध्यमातून घेऊ शकणार आहेत. जिओचे हे व्हॉटसअ्ॅप चॅटबॉट अन्य मोबाईल नेटवर्कसाठी देखील काम करत आहे. याच्या मदतीने युझर्स लस उपलब्धतेच्या माहितीसह जिओ अकाऊंट देखील रिचार्ज (Recharge) करू शकणार आहेत.

अशी घेऊ शकता लस उपलब्धतेची माहिती

रिलायन्स जिओची ही नवी सेवा जिओ केअर व्हॉटसअप चॅटबॉटच्या माध्यमातून युझर्सने आपला पिनकोड (Pincode) पोस्ट करून किंवा आपल्या परिसराचा पिनकोड टाईप केल्यानंतर लसीकरण केंद्र (Vaccination Center) आणि लस उपलब्धता रिफ्रेश करून लशीबाबतची संपूर्ण माहिती घेऊ शकतात.

हे वाचा - फ्रीमध्ये घरी आणा Mahindra ची कार; पाहा काय आहे कंपनीची ऑफर

जिओ युझर्स आता व्हॉटसअपच्या माध्यमातून मोबाईल पोर्टेबिलिटी सर्व्हिस, जिओ सिम, जिओ फायबर इंटरनेट, जिओ मार्ट आणि आंतरराष्ट्रीय रोमिंगचा सपोर्ट देखील मिळवू शकता. जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कवरून किंवा रजिस्ट्रेशन न केलेल्या क्रमांकावरून चॅटबॉट एक्सेस करताना अकाऊंटशी संबधित माहिती देण्यापूर्वी युझर्सची पडताळणी केली जाते.

चॅटसाठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा असेल पर्याय

जिओने या नव्या सेवेत भाषा बदलण्याचा पर्याय देखील दिला आहे. जर तुम्ही चॅटबॉटची भाषा बदलू इच्छित असाल तर चेंज चॅट लॅग्वेज (Change Chat Language) या ऑप्शनवर क्लिक करावे त्यानंतर आपल्या गरजेनुसार हिंदी किंवा इंग्रजी भाषेची निवड करावी. भविष्यात यामध्ये आणखी काही भाषांचा समावेश केला जाणार असल्याचे समजते.

Published by: Priya Lad
First published: June 10, 2021, 8:53 PM IST

ताज्या बातम्या